शेट्टी परिवाराकडून पोलिसांना ग्रिटींग कार्ड्स भेट

94

पुणे : सामान्य नागरिकांना कोणताही सण, उत्सव, मिरवणूक, कार्यक्रम मोठ्या आनंदाने, जल्लोषात साजरा करता यावा म्हणून स्वतःच्या परिवाराला सोडून आपल्या परिवाराच्या आनंदासाठी दिवसरात्र, चोवीस तास बारा महिने तटस्थ तैनात राहून कोणतीही वाईट घटना घडू नये, सण उत्सव सुरळीत पार पडावे म्हणून खाकी वर्दीतला माणूस सदैव कार्यरत असतो.

लालबागचा राजा गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत केलेली धक्काबुक्की असेल किंवा ऑन ड्युटीवर असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांनी ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी स्वराला थांबवले म्हणून त्या व्यक्तीकडून पोलिसांची कॉलर पकडून केलीली धक्काबुक्की असेल असे राज्यात आणि देशात अनेक घटना घडत आहेत. या सर्व घटना निंदनीय आणि चिंताजनक आहे.

चोर पोलीस किंवा गुन्हेगार आणि पोलीस अशी काही फिक्स समीकरणे नागरिकांच्या मनात अनंत काळापासून रुजवलेली असल्याने खाकी वर्दीतला माणूस देखील आपल्या सारख्याचं माणूस आहे, त्याला देखील संसार परिवार आहे, घरचं व्याप आहे तरी नेहमी डोक्यावर बर्फ ठेवून आपल्या रक्षणासाठी कार्यरत असतो.

चोर पोलिस किंवा गुन्हेगार आणि पोलीस या नात्यापलीकडे पोलीस मित्र होऊ शकतात, ही भावना हा संदेश माझ्या परिवारातील मुलामुलींना मिळावा आणि देशातील प्रत्येक व्यक्ती पर्यत हा संदेश पोहचावा म्हणून पुणे येरवडा परिसरात १० व्या दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या निमित्ताने ड्युटीवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना घरगुती पध्दतीने बनवलेल्या साधारण ५० धन्यवाद पत्रके (ग्रिटींग कार्ड) देऊन पुणे पोलीस प्रशासनाचे आभार व कौतुक व्यक्त करण्यात आले.

अनंत चतुर्थी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने पुण्यात तैनात असणाऱ्या साधारण ५०० पोलिसांना धन्यवाद/आभार पत्रके (ग्रिटींग कार्ड) देऊन पोलीस दलाचे कौतुक आभार व्यक्त करण्यात आले.

सर्व पोलिसांनी या संकल्पनेचे तोंड भरून कौतुक केले, लहान वयातचं मुलांना पोलिसांच्या प्रति योग्य मार्गदर्शन झाल्यास पोलिसांच्या प्रति असलेला गैरसमज दूर होण्यास मदत होईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मानसी, जिया आणि आयुष्य या लहान शालेय विद्यार्थ्यांनी त्यांची चुलती श्रध्दा शेट्टी यांची मदत घेत ५५० ग्रिटींग कार्ड्स घरगुती पद्धतीने तयार केली होती. पुढच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिसांचा आभार व्यक्त करण्याचा संकल्प करण्याचा येईल असे शेट्टी कुटूंबियाच्या वतीने सांगण्यात आले.