लासलगाव येथील रेल्वे स्थानकाची स्वच्छता

151

नाशिक (उत्तम गिते) :  लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान अंतर्गत लासलगाव येथील रेल्वे स्थानकाची स्वच्छता केली.सात महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक यांचे अंतर्गत दिलेल्या वेळापत्रकानुसार विदयालयातील विदयार्थानी स्वतः विविध प्रकारचे स्लोगन’चित्र, तक्ते तयार केली व तेथील प्रवाशांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.सदर अभियानात स्टेशन प्रबंधक सुरवाडे,एनसीसी प्रमुख प्रमोद पवार,विदयालयाच्या प्राचार्या अनिता आहिरे, क्रिडा शिक्षक केशव तासकर, रेल्वे कर्मचारी तसेच प्रवाशी संघटनेचे नितीन शर्मा, एनसीसी चे विद्यार्थी उपस्थित होते.या दरम्यान ज्या गाडीनी थांबा घेतला त्या प्रवाशांना स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले.रॅलीचे आयोजन करण्यात आले. अभियानात शेवटी स्टेशन प्रबंधक सुरवाडे व एनसीसी ऑफीसर प्रमोद पवार यांनी स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना व तेथील प्रवाशांना दिले तसेच क्रिडा शिक्षक केशव तासकर यांनी सुंदर चित्र,स्वच्छतेचे सुविचार’लिहिल्याबद्दल विद्यार्थाचे व स्टेशन कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,सचिव संजय पाटील,पं.स.सदस्या रंजना पाटील,संस्थेच्या संचालिका निता पाटील,शंतनू पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील,विद्यालयाच्या शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.