गणेश चतुर्थी निमित्त विंक म्युझिक आणि बॉलिवूड गायिका प्राजक्ता शुक्रे एकत्र

191

सण साजरा करण्यासाठी विंक म्युझिकवर खास; ‘विनायका प्रभुराया’ ट्रॅकचे प्रकाशन; कलाकारांच्या आगामी विशेष ट्रॅकपैकी पहिला

मराठी आणि बॉलिवूडची प्रख्यात गायिका प्राजक्ता शुक्रे हिच्या ‘विनायका प्रभुराया’ या नव्याकोऱ्या ट्रॅकचा शुभारंभ विंक म्युझिक अॅपवर करण्यात आला. विंक बिट्सवर खास भारतीयांसाठी सादर करण्यात येणाऱ्या सातगाण्यांच्या सिरीजमधील श्रीगणेशावर आधारलेले हे पहिले गाणे असेल. प्राजक्ता शुक्रे हिची हि विंक म्युझिकबरोबरची पहिलीच भागीदारी ओहे. विनायका प्रभुराया हे गाणे भारताचे आराध्य दैवत, कला सर्जनशीलता आणि ज्ञानाचा अधिपती गणपतीबाप्पावर आधारलेले आहे. या देवाची पूजा कोणत्याही विशिष्ट जाती-समुदायासाठी मर्यादित नाही, तो सर्व विघ्ने दूर करणारा आहे. हे गाणे प्रकाशित झाल्यानंतर 1 दशलक्षहून अधिक लोकांनी त्याचे स्ट्रिमिंग केले असून प्रादेशिक प्रकारात त्याचीलोकप्रियता वाढताना दिसते.

“माझा ट्रॅक विनायका प्रभुराया’च्या प्रकाशनामुळे फारच उत्साही आहे, खासकरून भारतातील विंक युजर्ससाठी. मी विंक म्युझिकचे आभार मानते, विशेषत: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी मला माझ्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मंच उपलब्धकरून दिला. मला आशा आहे की चाहत्यांना हा ट्रॅक नक्कीच भावेल. संपर्कात रहा, विंक म्युझिकवर आणखी काहीतरी घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईन!” असे प्राजक्ता शुक्रे म्हणाली.

“विंक’मध्ये आमच्या सर्वांच्या वतीने मंचावर प्राजक्ता शुक्रे हिचे स्वागत आहे आणि विंक युजर्सकरिता खास ‘विनायका प्रभुराया ट्रॅकचे प्रकाशन करताना आम्हाला मनोमन आनंद वाटतो. विंक म्युझिकची विस्तृत पोहोच आणि वितरण प्राजक्ताशुक्रेसारख्या नव्या दमाच्या ताऱ्यांना त्यांचे संगीत प्रभावीपणे चाहत्यांपर्यंत पोहोचवायला साह्य करेल. आज विंक म्युझिक हा एकमेव मंच आहे, जो कलाकारांना सविस्तर सांगीतिक पसंतीची दृष्टी देतो, जेणेकरून त्यांना आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीनेनियोजन करण्यास व त्याचा आनंद मिळवून देण्याकरिता मदत होते. आम्हाला अशा तरुण, आश्वासक प्रतिभावंतांसोबत काम करायला, त्यांना मंच उपलब्ध करून द्यायला आवडेल, ज्यामुळे त्यांची कला जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल”,असे भारती एअरटेलचे सीईओ- कंटेंट अँड अॅप्स, समीर बत्रा म्हणाले.

विंक म्युझिक ऐकण्याकरिता आणि डाऊनलोड करण्यासाठी: wynk.onelink.me/3330602766/VinayakaPrabhurayaYT