महेश मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या वतीने ‘नो हॉर्न डे’ निमित्त शहरात  विविध ठिकाणी जनजागृती

96

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे आणि शहर वाहतूक पोलीसांच्या वतीने आयोजित ‘नो होर्न डे’ उपक्रमाला प्रतिसाद देत महेश मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या वतीने महेश शिळीमकर यांच्या मार्गादर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

‘एक- दोन – तीन – चार , नो हॉर्न बार बार’ , ‘एमएच बारा, हॉर्नचे वाजवू बारा’ अशा घोषणा देत महेश मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांमध्ये जनजागृती करत हॉर्न न वाजविण्याचे आवाहन करत त्याचे दुष्परिणाम सांगितले. यामध्ये महेश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली कात्रज चौक येथे, चेतन जाज्वल यांच्या नेतृत्वात दत्त नगर चौक, आरटीओ चौकात सुनील गामाजी, सचिन गामाजी, आहिल्यादेवी चौकात सचिन ठाकूर तर गंगाधाम चौकात सुनील महेंद्रीकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

याबद्द्ल बोलताना महेश शिळीमकर म्हणाले, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाळासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शना नुसार हा उपक्रम आम्ही राबविला, वाढत्या ध्वनिप्रदुषणाला आळा घालण्यासाठी आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. ‘नो हॉर्न डे’ हा एक दिवसाचा उपक्रम न ठरता पुढील प्रत्येक दिवस नो हॉर्न डे ठरावा अशी आमची अपेक्षा आहे, हा उपक्रम राबविण्यासाठी नगरसेवक विशाल तांबे, वसंत मोरे, बाळाभाऊ धनकवडे, अश्विनी भागवत, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पी.आय. ताकवले साहेब यांचे सहकार्य लाभले.