पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले चिमुकल्याचे कान

119

सोलापूर:  बार्शी तालुक्यातील माणकेश्वर गावात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दीड वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. ताहेर बादेला असे या मुलाचे नाव आहे.

ताहेर अंगणात खेळत असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या अंगाचे लचके तोडायला सुरुवात केली. हे पाहून आजुबाजूचे लोक ताहेरच्या मदतीसाठी धावून आले. मात्र, तोपर्यंत ताहेर गंभीररित्या जखमी झाला होता. कुत्र्याने त्याच्या दोन्ही कानांचे अक्षरश: लचके तोडले. पालकांनी जखमी ताहेरला लगेचच रुग्णालयात दाखल केले. यावेळी पालकांनी ताहेरचे दोन्ही कान एका पिशवीत गुंडाळून आणले. सध्या ताहेरवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.