Pune Navle Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात; ट्रकची आठ ते नऊ वाहनांना धडक (Video)

पुणे : पुण्यातील नवले पुल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला (Pune Navale Bridge Accident) आहे. नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. यात आठ ते नऊ वाहनं धडकली आहेत. या अपघातात वाहनांचं (Pune Accident) मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (24 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

BIG NEWS : पहिल्या नजरेतच तो बिजनेस वुमनच्या नजरेत भरला, त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर लावला आणि मग, एकदिवस…

कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे विचित्र अपघात घडला. आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

BIG NEWS : पुण्याचा पाणी प्रश्न मिटणार, अशी आहे पुणेकरांसाठी योजना

या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. ट्रकच्या धडकेत अनेक महागड्या वाहनांचं नुकसान झालं आहे. सुझूकी, ह्युंडाई, रेनॉल्ट कंपनीच्या महागड्या कार मागच्या बाजूनं चक्काचूर झाला आहे. त्यासोबतच काही ट्रक आणि टेम्पोला देखील धडक बसली आहे.

Journalist : पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५० हजार दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास

या अपघाामुळे नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली. हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. शिवाय गाडी चालकांनीदेखील ट्रक चालकावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सगळी वाहनं रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम सुरु आहे.

Suicide : शेवटी तिने टोकाचा निर्णय घेतलाच…पतीवर जीवापाड प्रेम करणार्‍या पत्नीची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी बदनाम झाला आहे. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.

Lasya Nanditha : महिला आमदाराचा अपघातात जागीच मृत्यू