Pune Prahar : उत्कृट कार्याबद्दल प्रमाणपत्र देवुन कोरोना योध्दाचा सत्कार

84

तुळजापूर : उस्मानाबाद सोलापूर जिल्हयाच्या हद्दीवर निलेगाव केशेगाव खानापूर या गावातील सरपंच उपसरपंच व पोलिस पाटील यांनी गावचा व आजूबाजूच्या गावचा सीमा बंद करुन गावांमध्ये कोरोना येण्यास प्रतिबंध केल्या बद्दल त्यांचे मनोबल उंचविण्यासाठी उपविभागीयपोलीसअधिकारी कार्यालयाने त्यांना उपविभागीयपोलीसअधिकारी डाँ दिलीप टिपरसे यांच्या हस्ते त्यांच्या उत्कृट कार्याबद्दल प्रमाणपत्र देवुन या कोरोना योध्दाचा सत्कार केला.

तालुक्यातील पोलीस स्टेशन नळदुर्ग हद्दीतील मौजे निलेगाव, केशेगाव व खानापूर ही गावे उस्मानाबाद – सोलापूर सरहद्दीवर आहेत. सोलापूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असताना देखील वरील गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व कोरोना वॉरियर्स सदस्य यांनी एकजुटीने कर्तव्य बजावले. त्यांच्या गावाच्या सीमा पूर्णपणे बंद करून त्यांचे गावात व आजूबाजूचे गावात कोरोना आजाराचा संसर्ग पसरण्यास प्रभावी प्रतिबंध केला.

या त्याचा कार्याबद्दल उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिलीप टिपरसे यांनी प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करून असेच उत्कृष्ट कार्य करण्यासाठी त्यांचे मनोबल उंचावले आहे. यावेळी नळदुर्ग पोलिस स्टेशन चे सपोनि मनोहर वानखेडे तसेच इटकळ दुरक्षेत्रचे सहा. फौज. श्री. सातपुते, व पोकॉ. वाघमारे, पोकॉ. पवार हे उपस्थित होते.