मराठवाड्यातील स्थानिक आमदारांनी तसेच लोकप्रतिनिधींनी पुणे-मुंबई येथे अडकलेल्या लोकांची व्यवस्था करावी : आकाश मस्केपाटील

129

पुणे : अचानकपणे झालेल्या लॉकडाऊनमुळे मराठवाड्यातील कामासाठी गेलेले कामगार विद्यार्थी व इतर हे अडकुन पडले आहेत. लॉकडाऊनमधील काही काळ त्यांनी स्वखर्चातुन व सेवाभावी संस्थेच्या मदतीतून काढला परंतु आजक्षणाला काहीच उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांचे मात्र आता हाल होण्यास सुरु झाले आहेत.

विद्यार्थ्यांची तर विचारायची सोय नाही. काही जणांकडे स्वत:चे वाहन असल्याने रीतसर प्रक्रिया करुन मराठवाड्यातील आपआपल्या मुळ गावी त्यांनी प्रस्थान केले, परंतु बर्‍याच जणांकडे स्वत:चे कोणत्याही प्रकारचे वाहन नसल्याकारणाने ते तेथेच अडकून पडले आहेत. त्यामुळे सरकारची वाट न बघता आपल्या भागातील बांधवांना परत आणण्यासाठी मराठवाड्यातील सर्व आमदारांनी स्वइच्छेने पुढाकार घेत या सर्वांची येण्याची व्यवस्था तसेच त्यांची योग्य ती काळजी घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे अशी विनंती मराठवाडा बहुजन असोशिएसन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष आकाश मस्केपाटील यांनी केली आहे.

काही दिवासांपुर्वी सरकारने मोफत बससेवेची घोषणा केली व काही बसेस सोडल्याही परंतू सरकारच्याच यंत्रणामध्ये समन्वय नसल्याकारणाने त्यात बर्‍याच त्रुटी राहिल्या व मराठवाड्यातील लोकांची बरीच ससेहोलपट झाली व विद्यार्थ्यांचेही बर्‍याच प्रमाणात हाल झाले. यातील बहुतांश वर्ग हा कामगार व विद्यार्थी आहे.

या सर्वांसाठी सरकार घेईल तेव्हा निर्णय घेईल. सरकारकडेही पैश्याची चणचण असल्याचे दिसते आहे. तरी सर्व प्रकार लक्षात घेऊन मराठवाड्यातील स्थानिक आमदारांनी तसेच लोकप्रतिनिधींनी पुणे-मुंबई येथे अडकलेल्या लोकांची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसंग्राम वि. आ. चे पुणे शहरपाध्यक्ष व मराठवाडा बहुजन असोशिएसनचे संस्थापक अध्यक्ष आकाश मस्केपाटील, प्रकाश खैरे, कृष्णा देशमुख, प्रविण पवार अक्षय घोडके, नितीन खेडकर यांनी केली आहे.