पुण्यात अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर गुन्हा

164

पुणे : राज्याचे हॉटस्पॉट बनलेल्या पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गॅस किंवा विद्युत दाहिन्या राखीव ठेवण्यात आल्या आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी काही स्माशनभूमीत व्यवस्थाही करण्यात आली आहे.

पुणे विभागात ‘कोरोना’बाधिताचा रुग्णाचे निधन झाल्यास त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी गॅस किंवा विद्युत दाहिन्या राखीव ठेवण्यात आल्या आहे. तसेच या मृतदेहांवर पुण्यातील कैलास, औंध, बोपोडी, कात्रज, मुंढवा आणि वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था केली जाणार आहे.

कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना काय काळजी घ्यावी याबाबत पालिका प्रशासनाने धोरण ठरवले आहे. त्यानुसार विद्युत दाहिनी ऑपरेटर, तसेच इतर मदत करणाऱ्यांना पीपीई किट देण्यात आली आहे.

त्याशिवाय कोणी कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराला विरोध केला, तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पुणे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहेत.

पुणे विभागात ‘कोरोना’बाधिताचा रुग्णाचे निधन झाल्यास त्याचा मृतदेह कुटुंबीयांना दिला जाणार नाही, असा निर्णय पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यापूर्वीच घेतला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मृत व्यक्तीमुळे  वाढण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे पार्थिव कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार नाही.

♦ कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णावर गॅस अथवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करावेत.

♦ कोरोनाबाधित शव हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

♦ कोणत्याही नातेवाईकाला कोरोनाबाधित शव ताब्यात मिळणार नाही

मृतदेह दफन करायचा असल्यास?

मृतदेह दफन करायचा असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणावा लागेल. त्यामध्ये निर्जंतुक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये ठेवून दफन केला जाईल.