रमेश बागवे यांना विधान परिषदेवर संधी द्या : निम्हण

188

पुणे (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र राज्याचे  माजी गृहराज्यमंत्री तथा मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस घनश्याम भगवानराव निम्हण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली. परंतू बागवे यांनी आपली मातंग एकता आंदोलन ही राज्यव्यापी संघटना व सबंध मातंग समाज अधिक ताकदीने काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा करून पक्षाचे काम निष्ठेने पार पाडले.

बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे तथा तत्कालीन कॅबिनेटमंत्री हर्षवर्धन पाटील व इतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मागे मातंग समाजाची ताकद संघटनेच्या माध्यमातून बागवे यांनी उभी केली. तसेच समाजातील उपेक्षितांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये वंचित आघाडीला शह देण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच बहुजन समाजाच्या विकास व उन्नतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेल्या नेत्याला आता न्याय द्यावा.

महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या 21 मे रोजी होणार्‍या विधानपरिषद निवडणुकांमध्ये रमेश बागवे यांना आगामी विधान परिषदेमध्ये विधानपरिषद सदस्यत्व मिळालेच पाहिजे अशी मागणी निम्हण यांनी केली आहेे.