कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारानंतर तपासणी अहवाल निगेटिव्ह; मिनी घाटीत 20 रुणांवर उपचार

217

औरंगाबाद : अनिकेत घोडके

कोरोनाबाधित (कोविड 19) असलेल्या एका रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर त्यांची पुन्हा घेतलेली चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्या रुग्णास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज सुटी दिल्याचे घाटीचे डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

मिनी घाटीत आज 64 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 20 जणांना घरीच अलगिकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. 13 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटीत पाठवले.

काल आणि आजचे मिळून 28 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तर काल(मंगळवारी) रात्री उशिरा 17 वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.म्हणून आता एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. तसेच 64 जणांना देखरेखीखाली रुग्णालयात ठेवल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.