पुण्यात भिलवाडा पॅटर्न तातडीने राबवा : सागर जाधव

222

नागरिकांच्या तीन वेळा तपासण्या करण्याचीही मागणी

पुणे : शहरातील कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता अधिक रुग्ण असलेल्या भागात तातडीने भिलवाडा पॅटर्न लागू करावा, तसेच कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरातील नागरिकांच्या तीनवेळा तपासण्या कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वाहतूक आघाडीचे कार्याध्यक्ष सागर जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि आरोग्य प्रमुखांकडे याबाबतचे निवेदन दिले आहे.

सागर जाधव म्हणाले, “जिल्हा व पालिका प्रशासनाकडून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शहराच्या ज्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे तेथे भिलवाडा पॅटर्न लागू करायला हवा. बारामतीप्रमाणे हा पॅटर्न शहरातही लागू झाला, तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात लवकर यश येईल. तसेच संबंधित भागातील नागरिकांच्या तीनवेळा तपासण्या कराव्यात, जेणेकरून कोरोना पसरण्यावर आळा बसेल.”