“स्टीलबर्ड कनेक्ट शेअर अँड अर्न” लॉक डाउन च्या काळात करणार गरजूना साह्य  

121

या मोबाइल ऍप मुळे कोट्यवधी गरजूना मिळणार दरमहा ५०० रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी  

पुणे, ९ एप्रिल २०२०: कोविड – १९ विषाणूशी जगभर चाललेला लढा आणि लॉक डाउन मुळे रोजगाराच्या संधींचा अभाव अशा दुहेरी संकटात अडकलेल्या लोकांसाठी आघाडीची हेल्मेट उत्पादक असलेल्या स्टीलबर्ड हायटेक इंडिया ने एक खास मोबाइल ऍप विकसित केले आहे.   “स्टीलबर्ड कनेक्ट शेअर अँड अर्न” मुळे , ज्यांना उपजीविकेसाठी काही मार्ग नाही अशा लोकांना उपन्न मिळविण्याचा एक मार्ग सापडला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना स्टीलबर्ड हायटेक इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव कपूर म्हणाले, की सध्याच्या लॉकडाउन च्या परिस्थितीत रोजंदारीवर काम करणारे लाखो कामगार कामाविना बसून आहेत. अशा कामगारांना हे मोबाइल ऍप्लिकेशन वापरून दरमहा ५०० रुपयांची कमाई सन्मानाने करता येईल.  या  कठीण स्थितीत आमच्यातर्फे हे ५०० रुपये म्हणजे त्यांना आधार ठरेल असा मला विश्वास आहे.”

श्री कपूर म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासकीय संस्था प्रयत्नांची शर्थ करीत आहेत, परंतु या समस्येचे स्वरूप प्रचंड असल्यामुळे स्टीलबर्ड आपल्या परीने मदत करण्यासाठी या ऍप च्या माध्यमातून देशभरातील शहरात, महानगरात आणि खेड्यात काम नसल्यामुळे बसून रहावे लागणा-या लोकांना साह्य देऊ करीत आहे.

स्टीलबर्ड शेअर कनेक्ट अँड अर्न हे ऍप वापरायला अतिशय असल्याचे सांगून श्री कपूर म्हणाले की उद्योग आणि कॉर्पोरेट जगातील व्यवसायांना त्यांची उत्तम कामगिरी, उत्पादनांची प्रसिद्धी, समाजोपयोगी उपक्रम, सामाजिक जबाबदारीचे प्रकल्प अशी विविध प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोचविता येईल. आणि ते वापरणारी व्यक्ती ही माहिती आपल्या संपर्कातील व्यक्तींशी शेअर करून थोडी कमाई करू शकेल. कमाई ची रक्कम ५०० रुपयांवर गेली की सात दिवसात हे ऍप वापरणा-या व्यक्तीच्या बँक खात्यात ५०० रुपये जमा होतील.   हे पैसे वापरून दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करता येतील किंवा इतर खर्च भागविता येतील. महत्त्वाचे म्हणजे एखाद्या कुटुंबात ४ व्यक्ती असतील तर  त्या कुटुंबाचे उत्पन्न २००० रुपये एवढे होऊ शकेल.

श्री कपूर पुढे म्हणाले की ही एक उत्तम समाजसेवा आहे आणि स्टीलबर्ड या उपक्रमातून काहीही पैसे मिळविणार नाही. कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योगांकडून आलेले सर्व पैसे संबंधित ऍप वापर कर्त्यांना दिले जातील.  स्टीलबर्ड ची पूर्ण आय टी टीम या प्रकल्पासाठी काम करीत आहे आणि कंपनीचे सर्वर या ऍप च्या संचलनासाठी वापरले जात आहेत. सध्याच्या कसोटीच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी या सेवेत सहभागी होण्याचे आम्ही सर्व कॉर्पोरेट जगाला आवाहन करीत आहोत.

ऍप वापरणा-या व्यक्तीला एक मिनिटासाठी व्हिडीओ पाहून झाल्यानंतर तो शेअर करण्याची सोय आहे. अधिकाधिक व्यक्तींना या सोयीचा लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रति व्यक्ती कमाईची रक्कम ५०० रुपये दरमहा एवढी मर्यादित ठेवली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोचविण्याची आमची इच्छा आहे.

हे ऍप  कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी च्या श्रेणीत समाविष्ट करावे अशी आमची सरकारला विनंती आहे. तसे झाल्यास सी एस आर साठी वेगळ्या काढलेल्या निधीतून त्यावर केलेला खर्च होऊ शकेल. कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योग आपली उत्पादने आणि सेवांची जाहिरात टीव्ही , समाजमाध्यमे, रेडिओ, वृत्तपत्रे, गुगल आणि फेसबुक वर करतात. त्यांनी या ऍप चेही माध्यम वापरले तर समाजाला मोठी मदत होईल.

श्री कपूर म्हणाले, की कंपन्यांनी या ऍप साठी केलेला खर्च सामाजिक जबाबदारी उपक्रमावरील खर्च म्हणून संबंधित खात्यातून वजा करण्यासाठी ग्राह्य धरला जावा. यामुळे कंपन्या त्यांच्या उत्पादनांची / सेवांची जाहिरात करतानाच समाजातील गरजूंना मदत करू शकतील.

या शिवाय, या सेवेवरील वस्तू आणि सेवा कर माफ करण्यात यावा असेही आम्ही आवाहन करीत आहोत. अशा त-हेच्या जाहिरातींवर सध्या १८ टक्के दराने वस्तू आणि सेवा कर लागतो. हा कर कंपन्यांना द्यावा लागू नये आणि त्यांनी या सेवेवर केलेली सर्व गुंतवणूक गरीब जनतेपर्यंत पोचावी अशी आमची विनंती आहे.

स्टीलबर्ड कनेक्ट, शेअर अँड अर्न हे अप गुगल प्ले स्टोअर मधून डाउनलोड करता येते.