Pink Super Moon | आज दिसणार वर्षातील सर्वात मोठा चंद्र

156

नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत आहे. या परिस्थितीत जग एका अद्भूत खगोलीय घटनेचा साक्षीदार बनणार आहे. बुधवारी (8 एप्रिल) मध्यरात्री या वर्षातील सर्वात मोठा चंद्र दिसणार आहे. एवढचं नाही तर चंद्राचा रंग देखील बदलणार आहे. कारण चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. म्हणजे रात्रीचा चंद्र गुलाबी पाहायला मिळणार आहे.

काय आहे सूपरमून ?

जेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी होते आणि चंद्राची चमक वाढते तेव्हा अशा वेळी सुपरमूनचे दर्शन घडते. या काळात, चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्क्यांनी मोठा आणि 30 टक्क्यांनी अधिक चमकतो.

पिंक सुपरमून म्हणजे काय ?

पिंक सुपरमून हे फक्त एक नाव आहे, त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. अमेरिका आणि कॅनडामध्ये या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा नावाच्या फुलाचा बहर येतो, या फुलामुळे आज दिसणाऱ्या चंद्राला पिंक सुपरमून म्हटले जाते. हे फुल गुलाबी रंगाचे असते. त्यामुळे याला मॉस पिंक असे देखील म्हणतात.

सुपरमून भारतात कधी दिसणार?

आशियासह इतरांसाठीही सुपरमून 8 एप्रिल रोजी युनिव्हर्सल टाईमप्रमाणे मध्यरात्री 2.35 वाजता दिसेणार आहे. मात्र त्यावेळी भारतामध्ये सकाळी 8 वाजलेले असणार आहे. उजेड असल्याने हा चंद्र आपल्या येथे दिसणार नाही.

41 वर्षापूर्वी दिसला होता सूपरमून ?

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार, साधारण 41 वर्षांपूर्वी 1979 मध्ये पहिला सुपरमून दिसला होता. यंदा मे महिन्यातही सुपरमून दिसणार आहे.

कसा पाहता येणार सूपरमून?

सुपर मून पाहण्यासाठी कोणत्याही विशेष लेन्स किंवा इतर उपकरणांची आवश्यकता नाही. आपण आपल्या घराच्या बाल्कनी आणि टेरेसवरून देखील पाहू शकतो.