प्रशासनाला न जुमानता नचनवेल येथे बाजार भरलाच

138

कन्नड (प्रतिनिधी) काकासाहेब वाघ

सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरणा व्हायरसमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना जमून गर्दी करण्यास मज्जाव असतानासुद्धा गुरुवारी नाचनवेल येथे भरणारा आठवडी बाजार कोरोनाव्हायरसच्या धास्तीने बंद राहणार असल्याचे प्रशासनाने दवंडी देऊन जाहीर केले होते.

मात्र या दवंडीला न जुमानता नाचनवेल मध्ये गुरुवारी आठवडी बाजार भरला अन त्यात ग्राहकाची गर्दी दिसून आली. नाचनवेल हे बाजारपेठेचे गाव असून आजुबाजूच्या सात ते आठ गावांचा संपर्क येथे येतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी व व्यापारी यांनी भाजीपाल्याची दुकाने थाटली होती. यामुळे कोरणा सारख्या महामारीच्या आजाराला जनता गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले.

पोलीस प्रशासन वारंवार गावात फिरून जनजागृती करीत आहे तरी नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे, जमाव न करणे आदी सूचनाचे जेमतेम पालन केल्याचे दिसून येत आहे. सर्व जनतेने प्रशासनाच्या आव्हानाचे पालन करावे.असे आव्हान करण्यात आले आहे.