पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन

114

लासलगाव (समीर पठाण)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दंडूक्याचा प्रसाद देतात अशा घटना घडत असताना लासलगाव येथे बुधवारी पोलीस कर्मचारी कैलास महाजन,आहिरे यांनी भुकेने व्याकूळ असलेल्या वृद्ध इसमा जवळ जाऊन  चौकशी करत पोटभर जेवण आणि पाणी देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

लासलगाव पोलीस आपल्या कर्तव्यात मग्न असताना भुसावळ येथील एक वयस्कर इसम बँक ऑफ बडोदा समोरील झाडाजवळ बसलेले  असताना लासलगाव पोलीस ठाण्याचे कैलास महाजन, आहिरे यांनी त्यांना विचारपूस करत पाणी आणि जेवण देत  माणुसकीचे दर्शन घडविले.लासलगाव मध्ये कोरणाचा रुग्ण आढळल्याने गेल्या तीन दिवसांमध्ये संपूर्ण परिसर हा कडेकोड बंद आहे त्यामुळे सर्वसामान्यबरोबर अनेकांचे हाल होत आहे.

लासलगाव स्टेशन रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा जवळ आपले कर्तव्य बजावत असताना एक वृद्ध इसम कडाक्याच्या उन्हामध्ये झाडाखाली बसलेले दिसून आले भुकेने व्याकूळ असलेल्या या वृद्ध इसमाला पाणी आणि जेवण देत लासलगाव पोलीसांचे माणूसकीचे दर्शन केले आहे  माणुसकीचे दर्शन घडवणारी ही घटना निश्चितपणे पोलीस खात्याची प्रतिमा वाढविणारी आहे.