आता लोकप्रतिनिधींची वाट पाहू नका : रमेश उबाळे

88

बालाजी कन्स्ट्रक्शनतर्फे पोलिसांना मास्क, सॅनीटायझर वाटप

कोरोना हा महा भयंकर विषाणू आहे हे स्पष्ट झाले असून आशा परिस्थितीत सर्वच लोकप्रतिनिधीनी जनजागृतीचे काम करणे आवश्यक आहे. परंतु असे होताना दिसत नाही आता लोप्रतिनिधिंची वाट पाहण्यापेक्षा आपणच आपले संरक्षण करू या. असे आवाहन बालाजी कन्स्ट्रक्शनचे कुटूंबप्रमुख रमेश उबाळे यांनी केले आहे.

रमेश उबाळे म्हणाले, कोरोना हा एक लढा आहे. या लढ्यामध्ये आज लोकप्रतिनीधीनी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करण्यासाठी उतरले  पाहिजे. रस्त्यावर अहोरात्र लोकांच्या संरक्षणासाठी धडपडणाऱ्या पोलिसांना भेटून त्यांना किमान दिलासा देणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींचे हे कर्तव्य आहे. परंतु लोकप्रतिनिधिंकडून असे होताना दिसत नाही. मात्र  सामाजिक भावनेतून ही उणीव कुणीतरी भरून काढली पाहिजे म्हणून आम्ही बालाजी कन्स्ट्रक्शनतर्फे पोलीस कर्मचारी तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनीटायझर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. गेली दहा दिवस पोलीस कर्मचारी कोरेगाव शहरातील मुख्य चौक असणाऱ्या आझाद चौक व इतरत्र आपले कर्तव्य बजावत आहेत.

कोरेगाव तालुक्यात कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी प्रशासन खूप काम करत आहेत.  विशेषतः पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व त्यांचे पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. त्यांच्या या अथक परिश्रमामुळेच कोरेगावमध्ये कोरोना पोहचू शकला नाही. परंतु आता कुणी लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहचो ना पोहचो कोरोनवर आपणास  विजय मिळवायचा आहे. हेच आज अंतिम सत्य असून हे सत्य सर्वांनी लक्षात ठेवले पाहीजे. अहोरात्र रस्त्यावर काम करणाऱ्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना बालाजी कन्स्ट्रक्शनचा सलाम असेही रमेश उबाळे यावेळी म्हणाले. दरम्यान प्रांतकार्यालयात जाऊन या कार्यलयातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनीटायझर दिल्याचे उबाळे म्हणाले.

यावेळी उपस्थित असेलेले कोरेगाव पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेचे प्रमुख महादेव खुडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी  बालाजी कन्स्ट्रक्शनचे आभार व्यक्त केले.


लोकप्रतिनिधीनी बच्चू कडुंचा आदर्श घ्यावा

मंत्री बच्चू कडू आपण मंत्री, आमदार आहोत हे विसरून मतदार संघात थांबुन मतदार संघातील लोकांची काळजी घेत आहेत. हाच खरा माझ्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आहे. इतर लोकप्रतिनिधीनी मंत्री बच्चू कडू यांचा आदर्श घेऊन काम केले पाहिजे. अन्यथा आगामी निवडणूकांमध्ये तुमची जागा लोक दाखवून देतील असेही रमेश उबाळे अशी टीकाही उबाळे यांनी केली.