लासलगावमध्ये मजुरांच्या मदतीसाठी जाहिर आवाहन

178

लासलगाव : समीर पठाण

लासलगांव व परिसरामध्ये मोठ्या संख्येने मजुर वर्ग आणि स्थलांतरीत नागरीक असल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबाची दैनंदिन उपजिवीका करतांना मोठ्यापमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यांच्याकडे शिधा उपलब्ध नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांच्यासाठी शिधा उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे.

त्यामुळे लासलगांव व परिसरातील दानशुर व्यक्तींनी पुढे येवुन शिधा उपलब्ध करण्यासाठी निफाड तालुक्याचे तहसिलदार दिपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृ.उ.बा.समिती मुंबईचे संचालक जयदत्त होळकर, माजी उपसरपंच संतोष ब्रम्हेचा, माजी सदस्य चंद्रशेखऱ होळकर, गुणवंत होळकर, हरपालसिंग भल्ला, दिनेश जाधव, पत्रकार निलेश देसाई, अजय माठा, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय लासलगांव मध्ये मिटींग घेवुन परिसरातील दानशुर व्यक्तींना जाहीर आवाहन करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा गरजू मजुर व स्थलांतरी नागरीकांसाठी दानशुर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या मदतीसाठी साठी संतोष ब्रम्हेचा ९४२२२४६३४०, निलेश देसाई ९४२३४७९६७५,ग्रामसेवक शरद पाटील ८२०८८६१५९८,ग्रामपंचायत कार्यालय लासलगांव – ०२५५०-२६६०३४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.