करोना विषाणू मागचे अर्थकारण : तेज जहागिरदार

34

हा लेख लिहण्याचे कारण की सध्या भारत देशावर आणि जगावर कोरोना वायरसचे जीवघेणे सावट आहे. आता पर्यंत जगभरात 3 लाख पेक्षा जास्त लोकांना ह्या उजतखऊ-19 या विषाणूची लागण झाली आहे आणि 13 हजार पेक्षा जास्त लोक मृत पावले आहेत. रोज जगभरात 1 हजार रोज याप्रमाणे लोक मरत आहेत.


या विषाणूचा उगम झाला कसा?

हा प्रश्न मनात आला की विविध कहाण्या सध्या सोशल माध्यमे आणि प्रसार माध्यमावर फिरत आहेत. पण संशोधन अंती चीनमधील वुहान ह्या शहरातील राष्ट्रीय विषाणू शास्त्रसंशोधन केंद्रात झाली असे समजते.सध्या चीन हे सर्व खापर अमेरिकेवर फोडताना दिसत आहे पण येणार्‍या काळात जगासमोर पुराव्या सहित समोर येईलच.

होय, हे जैविक युद्धच?

वाचून, अवाक व्हाल पण हे युद्धच आहे, सर्वात आधी आपण जैविक युद्धाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. तसा जैविक शस्त्रवापरणे याचा इतिहास खूप जुना आहे. साधारण दुसर्‍या महायुद्धात पहिल्यांदा शत्रूला नमवण्यासाठी जैविक शस्त्र तयार केले आणि वापरण्यात आले. अमेरिका, जर्मनी, इस्त्राईल, रशिया अशा देशांनी याचा उपयोग केला होता. याचा पुढे वापर होऊ नये म्हणून जैविक शास्त्रे आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा अंमलात आणला आणि सहमतीने जगाने जैविक शास्त्र वापरायचे नाहीत असा अलिखित करार केला.

पण चीनने हे अघोषित जैविक युद्ध का पुकारले?

ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याअंती उत्तर चीनचे अर्थकारण आणि जगाला आपली ताकद कळावी यामध्ये सापडते. चीनने 1960 नंतर आपल्या आर्थिक धोरणात खूप आमूलाग्र बदल केले त्यामुळे आज चीन हे जगातील 2 नंबरचा आर्थिक महासत्ता देश आहे. 2019 हे आर्थिक वर्ष हे गेल्या 29 वर्षातील सर्वात हालाकीचे होते. चीनचा जीडीपी, विकासाचा घसरणारा टप्पा हे सर्व चीनला पाहवत नसावे. चीनने कोरोना सारखा विषाणू तयार करून स्वतः बरोबरच अनेक देशांचे नुकसान केले आहे.

जगाला कोरोना विषाणूने ग्रासण्यापूर्वी चीनमधील रासायनिक आणि तंत्रज्ञान उद्योगा मध्ये परकीय गुंतवणूकदारांचा मोठा वाटा होता. (चीन मध्ये सगळ्यात मोठा रासायनिक आणि तंत्रज्ञान या उद्योगांचा सगळ्यात मोठा वाटा आहे.) या कंपन्यांचा नफ्यात अर्धा वाटा थेट परकीय गुंतवणूकदरांच्या तिजोरीत जात होता. याच कंपन्यांनी युनानचे अवमूल्यन केले होते.