‘मेड इन पुणे’… एका आठवड्यात 1 कोटी चाचण्या करणारं ‘किट’ तयार; ICMRचाही होकार

105

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. अनेक देशात या विषाणूनं हातपाय पसरले असून, संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रयोगशाळेत किटची कमतरता भासत होती. टेस्ट करण्यासाठीची किट परदेशातूनच आयात करावी लागत होती.

हीच अडचण लक्षात घेता पुण्यातल्या कंपनीनं 6 आठवड्यात संशोधन करून 100 टक्के स्वदेशी बनावटीची किट तयार केली आहेत. पुणेस्थित मायलॅबने आठवड्यातून 1 लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटनं 100 रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे देशातल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(ICMR)नंही याला मान्यता दिली आहे.