खंडणीच्या गुन्हयात मंगलदास बांदल गजाआड

347

सराफा व्यावसायिकाकडे 50 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना आज (शनिवारी) अटक करण्यात आली.

या प्रकरणात बांदल यांचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर पुण्याच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना गजांआड केले. या प्रकरणात याआधी बांदल यांच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर बांदल यांना खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात बोलावले होते. तेथे केलेली चौकशी आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.