जग बदलण्यासाठी पुणेकरांनी निवडला डिजिटल मार्ग

30

सामाजिक बदलांसाठी कसा करून घेतला क्राउडफंडिंगचा फायदा

तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी भारतामध्ये डिजिटल फंडरेजिंगचा अधिक प्रमाणावर वापर होत असला, तरी पुण्यामध्ये या सुविधेचा वापर सामाजिक व त्याच्याशी निगडित उद्दिष्टांसाठी होताना दिसतो. महत्त्वाची बाब म्हणजे शहरातून (पुणे) फंडरेजिंगच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या १३ कोटी रुपयांच्या निधीपैकी ७६ टक्क्यांहून कमी निधी वैद्यकीय कारणांसाठी वापरला गेला आहे. भारतातील अन्य शहरांमध्ये हेच प्रमाण ८०-८५ टक्क्यांहून अधिक आहे. 

इतरांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याची इच्छा असलेल्या जगभरातील समविचारी माणसांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी क्राउडफंडिंग हे महत्त्वाचे माध्यम आहे. सामाजिक समस्या सोडविण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन झटणारे आणि त्यासाठी ऑनलाइन मदतीचा आधार घेणारे युवक आपल्याला आसपास दिसून येतात.  महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ८० हून अधिक मुलांना दत्तक घेणारा, कम्प्युटर सायन्स क्षेत्रात काम करणारा अलोक देशमाने हा याचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे, असे मिलापचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मयुख चौधरी सांगतात.

देशमाने यांच्याशिवाय पाळीव प्राणी व इतर प्राण्यांसाठी काम करणाऱ्या आणि सामाजिक क्षेत्रातून फारसा प्रतिसाद मिळू न शकलेल्या समीर व्होरा यांनीही फंडरेजरचा पर्याय स्वीकारला. तुम्ही तुमची गरज जेव्हा जगापुढे मांडता तेव्हा तुमच्या उद्दिष्टासाठी तुमच्याप्रमाणेच तीव्र इच्छाशक्ती बाळगणाऱ्या व्यक्ती तुमच्यासोबत येतात. अशाच ३७०० व्यक्तींनी समीर यांना ७१ लाख रुपयांहून अधिक रकमेची मदत केली त्यातून त्यांना ४०० हून अधिक भटक्या किंवा जखमी प्राण्यांसाठी निवारा उभारणे शक्य झाले, असे चौधरी नमूद करतात.

वरकरणी पाहता मतीन भोसले हे सर्वसाधारण शिक्षकासारखे भासतात. पण त्यांच्या समाजावर असलेला शिक्का पुसून टाकण्यासाठी त्यांनी उभारलेला लढा त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतो. भोसले हे फासेपारधी समाजातील असून १८५७ नंतर तत्कालिन ब्रिटीश सरकारने कायदा करत या समाजावर गुन्हेगार समाज अशा शिक्का मारला होता. अर्थात नंतर हा कायदा रद्द केला गेला. मात्र, या समाजाबाबतचा दृष्टिकोन फारसा बदलला नाही. शिकार करत किंवा भीक मागत काही वेळा उपाशी राहात वाढलेल्या मतीन यांना सर्वसाधारण आयुष्य जगण्याची संधी मिळालीच नाही. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्यांचे वडील शेतमजूर म्हणून काम करत असताना त्यांच्या मालकाने मतीन यांना शाळेत पाठवण्याचा आग्रह केला आणि मतीन यांनी ही संधी साधली आणि फक्त शाळेतच गेले नाहीत तर पदवीधरही झाले.

मतीन भोसले यांनी अमरावती जिल्ह्यातील मंगळूर चावला येथे फक्त फासेपारधी समाजातील मुलांसाठी प्रश्नचिन्ह आदिवासी शाळा (क्वेश्चनमार्क आदिवासी स्कूल) उभारली. शिक्षक म्हणून नोकरी करताना केलेली बचत आणि घरातल्या सहा बकऱ्या विकून सन २०१२ मध्ये ८५ मुलांना सोबत घेत त्यांनी या शाळेची सुरुवात केली. सध्या ७८ वर्षांचे असलेल्या शांकुली भोसले या आपल्या काकांकडून मिळालेल्या तीन एकर जमीनीवर उभारलेल्या गवतापासून बनवलेल्या झोपडीत त्यांनी ही शाळा सुरू केली. अनेक वर्ष थोडीथोडी बचत करून मतीन यांच्या काकांनी १९७० मध्ये २०० रुपयांना ही जमीन खरेदी केली होती. ते जंगलातून घोरपड, ससे, रानडुक्कर, भारद्वाज पक्षी पकडून अमरावती शहरात त्याची विक्री करत असत. मतीन यांच्या पत्नी सीमा त्यांना ही शाळा चालविण्यासाठी मदत करतात. त्यांनी तिनही मुले याच शाळेत अमरावती, बीड, धुळे, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील पारधी वस्तीमधील मुलांसोतच शिकतात. इथे मुलांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही मोफत शिक्षण दिले जाते. शाळेतील एकूण आठ शिक्षकांपैकी चार फासेपारधी समाजातील आहेत.

सर्व अडथळ्यांवर मात करत या प्रश्नचिन्ह आदिवासी शाळेतून ५० हून अधिक विद्यार्थी यशस्वीरित्या दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्यांनी राज्यातील इतर शहरांची, गावांची वाट धरली आहे.सन २०१७ आणि २०१८ मध्ये या शाळेच्या विद्यार्थिनींच्या कबड्डीच्या संघाने तालुका आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, आजही या शाळेत ४५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे एकट्याच्या बळावर शाळा चालवणाऱ्या मतीन यांची चिंता कायम आहे. म्हणूनच मतीन यांनी आपल्या शाळेला आधार म्हणून तसेच अनेक वर्ष वंचित राहिलेल्या या समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्यावरील सामाजिक कलंक पुसता यावा, यासाठी सक्षम बनविण्यासाठी मिलाप या ऑनलाइन फंडरेजरची मदत घेतली आहे. तेही या देशाचा एक भाग आहेत, त्याची दखल घेतली जावी, अशी मतीन यांची मागणी आहे. आतापर्यंत २१०० हून अधिक व्यक्तींना या शाळेला ऑनलाइन माध्यमातून मदत केली असून त्यातून ४० लाख रुपयांहून अधिकची रक्कम उभी राहिली आहे. देणग्यांचा ओघ अद्याप सुरूच आहे.

मतीन, समीर आणि अशोक यांच्या उदाहरणांवरून माणुसकीला साथ देणारी माणसे जगभर आहेत. ती एखाद्या उद्दिष्टाविषयी असलेली तुमची तळमळ जाणतात, संधी मिळाल्यास पुढे येत अपेक्षित बदलासाठी तुम्हाला साथ देतात हे सिद्ध होते. सामाजिक परिवर्तनासाठी ऑनलाइन क्राउडफंडिंग हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्यांनी पूर्णतः पारदर्शक पद्धतीने आणि तळमळीने त्याचा वापर केल्यास त्यांना जगभरातून मदतीचा हात मिळू शकतो. त्यामुळेच डिजिटल क्राउडफंडिंग हा भविष्यातील शाश्वत मार्ग आहे, हे पुणेकरांनी सिद्ध केले आहे. 

याशिवाय, आपल्यापैकी कोणाला वैद्यकीय कारणांसाठी आर्थिक मदत हवी असल्यास, तुम्ही खालील सूचनांप्रमाणे सहज फंडरेजिंग मोहीम सुरू करू शकता.

त्यासाठी  https://milaap.org/fundraisers/new ही वेबसाइट पहा.

किंवा ९१-९९१६१७४८४८ या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज पाठवा.

काही अडचण आल्यास अथवा अधिक माहितीसाठी feedback@milaap.org या ई मेलवर संपर्क साधा.

वेबसाइटवर असलेल्या  https://milaap.org/faq या लिंकवर असलेली नेहमी भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पाहून तुमच्या मोहिमेसाठी सोपे पर्याय आणि काही टिप्स तुम्हाला नक्की मिळतील.