विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची पुणे व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा

207

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व्यापारी महासंघाने विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन या आपत्तीच्या प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत, असे आश्वासित केले.

पुणे जिल्हयात अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधी नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. तथापि, आपणहून पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत असल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री. राम यांनी व्यापारी महासंघाला धन्यवाद दिले.

यावेळी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष रतन किराड, राजेश शहा, सुभाष संघवी, सूर्यकांत पाठक, सचिव महेंद्र पितळीया, सहसचिव हेमंत शहा, जयंत शेटे, खजिनदार मनोज सारडा, सदस्य अभय गाडगीळ यांनी तसेच पुणे मर्चंट चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे मान्य केले.