वैष्णवी फॅशन प्रॉडक्शन कंपनीचा होणार लातूर येथे ग्रँड फॅशन शो

504

पुणे । (प्रतिक गंगणे)

समाजात सर्व सामान्य लोकांनमध्ये सुधा कलाकार दडलेले असतात. असच काही वैष्णवी फॅशन प्रोडक्शन कंपनीने मागील काही दिवसात झालेल्या ‘वन्स मोर पुणे फॅशन शो’ मध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.

कंपनीने मागील फॅशन शोच्या नवोदित कलाकारांना घेऊन ‘शेतकरी राजा’ हे गीतचे उदघाटन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मिसेस इंडीया 2019 च्या विजेत्या माधुरी माकनिकर ह्या करणार आहे. कंपनीच्या डायरेक्टर सौ. अनिता गोरक्ष कुंजीर यांनी असे जाहीर केले की लातूर मधे खुप कलाकार दडलेले आहेत ती कला जनतेसमोर यावी म्हणून शोचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण शर्वरी सुरवसे (मॉडल आणि अभिनेत्री) तसेच हितैशी पाटील (मॉडल आणि अभिनेत्री) हे असणार आहेत.

कार्यक्रमाचे नियोजन राहुल पाटील व सोमनाथ सुरवसे हे पाहाणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन अंजली सोनटके, अभिजीत बारवकर, रेखा निंबाळकर, रश्मी खरवलीकर, आंनद गोडसे, निल राठोड, अशिश कोठावले, अक्षय चव्हाण, ऐश्वर्या देशमुख, प्रवीण राना, पवन सोनोने, भूषण सोनार, सैफाली सैय्यद, हे काम पाहत आहे.

आईडल हावर्सचे डायरेक्टर मनीष चैतन्य व ग्रूप हे मेकप आर्टिस्ट आणि ड्रेस डिझायनर क्विन डिझाईन सुडिओ इमरान चौधरी व वर्षा शिंदे सर्व आयोजन करत आहे.

वैष्णवी फॅशन प्रॉडक्शनकडून नवोदित कलाकारांना सोबत घेऊन ‘शेतकरी पँटर्न’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करत आहे.

इवेन्ट मॅनेजमेंट – आरंभ इवेन्ट प्लानर्स श्रीकांत राउतरॉ हे करणार आहेत.