ग्रामीण भागांमध्ये सिनेमागृहात होणारा एकमेव नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टीवल

299

पुणे प्रहार | ग्रीन वूड क्रिएशन मार्फत नवोदित कलाकार आणि दिग्दर्शकासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून १, २ आणि ३ मार्च २०२० रोजी केशर सिनेमागृह इंदापूर येथे चौथ्यांदा नॅशनल शाॅर्टफिल्म फेस्टीवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. गत वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात, कोलकत्ता, तामिळनाडू, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यातील १६१ शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्या आहेत अशी माहिती फेस्टीवलचे दिग्दर्शक सोमनाथ जगताप यांनी दिली.

सहभागी होणाऱ्या स्पर्धत उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, संकलन, संगीत, अभिनय, पटकथा, बेस्ट ज्युरी अॅवार्ड अशा विविध गटांतील स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच प्रथम उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी १५ हजार रूपये पारितोषिक व स्मृतिचिन्ह, द्वितीय उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी १० हजार रूपये पारितोषिक व स्मृतिचिन्ह, तृतीय उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी ७ हजार रूपये पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी या फेस्टीवलच्या माध्यमातून शहरी कलाकारांप्रमाणे ग्रामीण भागांतील नव नवे चेहरे आणि ठसकेबाज विषय घेऊन बनवलेल्या शॉर्ट फिल्म आपल्याला पहायला मिळतील आणि यातूनच आपल्याला नवीन अभिनेते मिळतील.

तसेच ग्रामीण भागांत शॉर्ट फिल्म म्हणजे नक्की काय असते हे समजायला मदत होईल त्यासाठीच आम्ही याही वर्षी इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवलचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे इंदापूर शहराचे नाव फेस्टीवलच्या माध्यमातून सर्व चित्रपट क्षेत्रात उंचावण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. फेस्टीवलचे ज्युरी सदस्य म्हणून मा. चंद्रशेखर जोशी सर (पुणे) महेश्वर राव (हैदराबाद) आणि एम. मनिराम (आसाम) हे काम पाहत आहेत. ग्रामीण भागामध्ये सिनेमागृहात होणारा एकमेव नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टीवल म्हणून या फेस्टीवलची ओळख संपूर्ण देशात झालेली आहे.