सॅमसंगची रूम एअर कंडिशनर्सची आकर्षक २०२० श्रेणी दाखल

83

ग्राहकोपयोगी इलक्ट्रॉनिक उत्पादनांच्या क्षेत्रातील भारताचा सर्वात मोठा आणि विश्वासाचा ब्रँड – सॅमसंगने आज महाराष्ट्रामध्ये २०२० एअर कंडिशनर्सची नवी श्रेणी दाखल केली. एसीच्या सर्व प्रकारांतील उत्पादने अतिशय वाजवी किंमतीमध्ये ग्राहकांच्या भेटीला आणत एसी विभागातील प्रत्येक बाजू व्यापणारी स्पर्धक कंपनी म्हणून सॅमसंगने बाजारपेठेत पुन:प्रवेश केला आहे.

सौंदर्यपूर्णरित्या डिझाइन केलेली आणि प्रत्येक घराला परवडेल अशा किंमतीत उपलब्ध असलेली ४२ मॉडेल्सची ही श्रेणी आकर्षक फुलाफुलांच्या आणि अप्रतिम पट्टेदार डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. याखेरीज देशभरातील ग्राहकांच्या मागणीशी मेळ साधण्यासाठी सॅमसंगने प्रत्येक टनेज आणि स्टार रेटिंग विभागातील आपल्या कॉपर कंडेन्सर श्रेणीचाही विस्तार केला आहे व या श्रेणीमध्ये आता विविध मॉडेल्सचे ३२ पर्याय उपलब्ध आहेत.

२०२० एसी श्रेणीमध्ये वाय-फाय क्षमता असलेला विंड-फ्री एसी २.०, ह्युमन डिटेक्शन आणि ग्रीन RR2 गॅस, प्रिमियम ट्रिपल इनव्हर्टर सीरीज आणि इको इन्व्हर्टर सीरीज यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रामध्ये ऊर्जास्नेही एसी वापरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. २०१९ मध्ये या प्रांतातील प्रत्येक पाच ग्राहकांपैकी एका ग्राहकाने फाइव्ह-स्टार एसी घेतला. २०२० मध्‍ये पुण्यातील सॅमसंग एसींच्या एकूण विक्रीमध्ये ३०% वाटा हा इन्व्हर्टर विभागातील फाइव्ह-स्टार एसींचा असेल अशी आमची अपेक्षा आहे. पुणे ही एसींसाठीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, राज्यातील सरसकट विक्रीमध्ये पुण्याचा १३% वाटा आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील ग्राहक हा नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करणारा आहे व त्याचवेळी ऊर्जाबचतीचा विचार करणाराही आहे आणि म्हणूनच पुण्यातील विकल्या जाणा-या एसींपैकी जवळजवळ ८०% एसी हे इन्व्हर्टर मालिकेतील आहेत.

ग्राहकांना वेळच्या वेळी आणि सर्वोत्कृष्ट सेवा मिळावी या हेतूने सॅमसंगने महाराष्ट्रात आपल्या एसी इन्स्टॉलेशन टीममध्ये दुप्पट वाढ केली आहे.

याखेरीज वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रामध्ये खास एसींसाठीची ३० स्टोअर्स सुरु करण्याची सॅमसंगची योजना आहे. ही स्टोअर्स म्हणजे आपल्या घरांसाठी किंवा कार्यालयांसाठी किंवा कोणत्याही इतर B2B प्रकल्पांसाठी एअर कंडिशनिंग उत्पादनांच्या शोधात असलेल्या ग्राहकांच्या एअर कंडिशनिंग आणि हीटिंग यंत्रणेसंबंधीच्या सर्व गरजा पूर्ण करणारी ‘वन-स्टॉप शॉप्स’ असणार आहेत.

”सॅमसंगने महाराष्ट्रामध्ये आपली २०२० एसी उत्पादनश्रेणी दाखल केली आहे. हे राज्य म्हणजे आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. २०२० मध्‍ये महाराष्ट्रातील आमचा व्यवसाय दुपटीने वाढेल व हे राज्य आमच्या विकासाला आणखी गती देणारी प्रमुख बाजारपेठ ठरेल अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या नव्या उत्पादनश्रेणीद्वारे या सर्व अपेक्षा पूर्ण होतील याची खबरदारी आम्ही घेतली आहे. शिवाय, ग्राहकांनाही सॅमसंगसारख्या सर्वाधिक विश्वासाच्या ब्रँडकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेली उत्पादने मिळतील.” सॅमसंग इंडियाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेसमधील HVAC विभागाचे सीनियर व्हाइस प्रेसिडंट श्री. राजीव भुतानी म्हणाले.

किंमती आणि फायदे :

सॅमसंगच्या २०२० एसी उत्पादनश्रेणीमध्ये विंड-फ्री २.०, प्रिमियम ट्रिपल इन्व्हर्टर सीरिज इन्व्हर्टर, इको इन्व्हर्टर आणि ऑन/ऑफ एसी अशा सर्व प्रकारांतील एकूण ४१ एसींचा समावेश असणार आहे. स्प्लिट एसींची नवी मालिका ३५,९९० रुपयांपासून सुरू होईल व त्यात ७३,९९० रुपयांपर्यंतचे एसी उपलब्ध असतील.

सॅमसंगने आपल्या डिजिटल इन्व्हर्टर कम्प्रेसर श्रेणीसोबत १० वर्षांची वॉरंटी देत, दीर्घकाळ चालणारे, अत्यंत टिकाऊ उत्पादन ग्राहकांना देण्याची योजना आखली आहे. प्रिमियम ट्रिपल इन्व्हर्टर सीरिजमधील कूपर कन्डेन्सर मॉडेल्स तसेच विंड-फ्री २.० एसींमध्ये कन्डेन्सरवर ५ वर्षांची वॉरंटी तर पीसीबी कंट्रोलरवरही ५ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना संपूर्ण मन:शांती मिळावी.

ही उत्पादने खिशाला अधिक सुसह्य व्हावीत यासाठी सॅमसंगने आकर्षक EMI पर्यायही आणले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना शून्य डाऊन पेमेंटसह सॅमसंग एसी घरी घेऊन जाता येईल. याखेरीज ग्राहकांना मोफत इन्स्टॉलेशन किंवा ४९९ रुपयांत इन्स्टॉलेशन यांसारख्या इन्स्टॉलेशन ऑफर्सही दिल्या जाणार आहेत. याचबरोबर त्यांना विविध बँका आणि फॉर्मेट्सच्या माध्यमातून विंड-फ्री मॉडेल्सवर १०% कॅशबॅक तर प्रिमियम ट्रिपल इन्व्हर्टर सीरिजवर ५% कॅशबॅकही मिळू शकणार आहे.