पुणे पोलिसांचं कामकाज आठ तासांचं करावं : शेरआली शेख

403

प्रतिक गंगणे । पोलिसांना घरदार सोडून रात्र व दिवस ड्युटीवर असावे लागते. भारताला स्वातंत्र्य मिळून अंदाजे 72 वर्षे झाली तरी पोलीस खात्याचा कोणी विचार करत नाही. तरी पुणे पोलिसांचं कामकाज आठ तासांचं करावं असं मत अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. शेरआली शेख यांनी मांडले.

पोलीस हा एक मानव आहे. मानवाच्या शरीराला आरामाची आवश्यकता असते. तोच पोलीसांना भेटत नाही व न भेटल्यामुळे अनेक गंभीर आजाराची संभावना असते. पोलीसांवर सण, उत्सव, जयंत्या कार्यक्रमाद्वारे येणारा ताण, कामाचे सलग तास, जेवणाच्या अनिश्चित वेळा, पुरेशी झोप न मिळणे अशा समस्यांमुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून पुणे पोलिसांचं कामकाज आठ तासांचं करावं अशी मागणी माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांच्या कडे शेरआली शेख यांनी केली.