कशिश प्रॉडक्शन्स आयोजित फॅशन शो उत्साहात

545

पुणे : पुणे येथील 90 डिग्री रेस्टो ला कशिश प्रॉडक्शन्स तर्फे लहान मुले, मुली, पुरुष व महिला यांचा फॅशन शो विविध मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला.

शो चे नाव मिस्टर, मिस, मिस्सेस व किड्स फॅशन सेन्सेशन ऑफ पूणे असे होते.

आयोजक व कोरिओग्राफर योगेश पवार, सह कोरिओग्राफर भाग्यश्री बोरसे व अलंकृता शाह, इव्हेंट हेड नम्रता काळे, प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक मुद्रा ग्रुपचे चेअरमन उमेश पवार, कृष्णा देशमुख,उद्योजक नाझीम शेख,पूर्णिमा लुणावत, अश्विनी शेवाळे, संजीवनी बाल्गुडे, रुषिकेष बाल्गुडे, परेश अंतरे, गूरूवर्य प्रकाश भाऊ शिंदे, अभिनेते विशाल घोलप व साहिल कुमार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रेक्षक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेला जुरी म्हणून प्रियंका मिसाळ, भावना शर्मा, मुग्धा देशपांडे व प्रसाद खैरे असे दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

आयोजक योगेश पवार यांनी नवीन मॉडेल्स तसेच ग्रामीण भागातील मॉडेल्सला संधी देऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली. विशेष म्हणजे योगेश पवार यांनी आत्ता पर्यंत 1400 मॉडेल्स ला ग्रूम केले आहे आणि यामुळेच कशिश प्रोडक्शन्स ने फॅशन इंडस्ट्री मध्ये मोठी झेप घेतली आहे.

या स्पर्धेचे विजेते प्रियांका बेण्दाळे, नुपुर पंडित, विष्णू कुरूप, गार्गि पाटोळे, देवान्श भराटे व म्रुण्मयी क्षीरसागर हे विजेते ठरले. विशेष म्हणजे ह्या स्पर्धेला एकूण 80 स्पर्धकांनी भाग घेतला.