महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विद्यार्थी आणि पदाधिकारी मेळावा संपन्न

178

1000 विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने विद्यार्थी आणि पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महाराष्ट्रभरातून 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते. मेळाव्याचे उदघाटन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या हस्ते झाले, अशी माहिती सनी मानकर (राष्ट्रीय सचिव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस) यांनी पत्रकाद्वारे दिली. हा मेळावा रविवारी सायंकाळी आशिष गार्डन (कोथरूड, पुणे) येथे पार पडला.

माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर, स्वाती पोकळे, महेश हांडे, विशाल मोरे, हर्षवर्धन मानकर, स्वप्नील दुधाणे, किरण शिखरे, नितीन कळमकर, जावेद इनामदार उपस्थित होते. या मेळाव्यात सोनिया दुहन आणि दीपक मानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात पुणे, मुंबई, पंढरपूर, नागपूर, लातूर, नाशिक, अहमदनगर, अमळनेर, दौड, परभणी, उदगीर, हिंगोली, बारामती, सोलापूर येथील पदाधिकारी सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत आणि विद्यार्थी संघटना स्थापन करण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता, असे सनी मानकर यांनी सांगितले.