रॉयल एनफिल्डने लाँच केली BS VIची पूर्तता करणारी क्लासिक 350

176

रॉयल एनफिल्ड या मध्यम आकारमानाच्या मोटरसायकल विभागातील जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपनीने नवीन भारत स्टेज VI ची पूर्तता करणाऱ्या रॉयल एनफिल्ड क्लासिक 350ची घोषणा केली आहेकंपनीच्या युनिट कन्स्ट्रक्शन इंजिन (यूसीईप्लॅटफॉर्मखाली तयार झालेली ही नवीन उत्सर्जन नियमांचे पूर्तता करणारी पहिली मोटरसायकल आहेनवीन क्लासिक 350 ड्युअल चॅनल एबीएस प्रकारची मोटरसायकल स्टेल्थ ब्लॅक व क्रोम ब्लॅक या दोन नवीन कलरवेजमध्ये आणली जाणार आहेयाशिवाय सिग्नल्स एअरबोर्न ब्ल्यूसिग्नल्स स्टॉर्मरायडर सॅण्डगनमेटल ग्रे आणि क्लासिक ब्लॅक हे रंग यांत आहेतआजपासून ही मोटरसायकल भारतातील सर्व डीलरशिप्समध्ये उपलब्ध होईलतिची किंमत (एक्सशोरूम,६५,०२५ रुपये आहे.  

 नवीन नियामक उत्सर्जन नियमांमध्ये संक्रमित होणारी क्लासिक 350 ड्युअल एबीएस ही पहिली मोटरसायकल आहेया पोर्टफोलिओमधील अन्य मोटरसायकल्सही ३१ मार्च २०२०पर्यंत बीएस VIची पूर्तता करणाऱ्या श्रेणीत आणल्या जाणार आहेत.

 रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आता इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टमने (ईएफआयसुसज्ज असेलयामुळे मोटरसायकलचे परिष्‍करणचालवण्याची क्षमता (ड्रायव्हिबिलिटीआणि सातत्यपूर्ण कोल्ड स्टार्टअॅबिलिटी सुधारण्यात मदत होईल तसेच कोणत्याच परिस्थितीत चढउतार न होता शक्तीची निर्मितीही सुरळीत होईलबीएस VI उत्सर्जन नियमांची पूर्तता करतानाच संपूर्ण ऑपरेटिंग कक्षेत वाहनाची कामगिरी सुधारावी तसेच श्रेष्ठ दर्जाचा रायडिंग अनुभव मिळावा अशा पद्धतीने एकंदर इंजिनची शक्ती आणि टॉर्क डिलिव्हरी अनुकूलित करण्यात आली आहेस्टेल्थ ब्लॅक आणि गनमेटल ग्रे कलरवेजमधील क्लासिक 350 मिश्रधातूच्या (अलॉयचाकांनी व ट्युबललेस टायर्सनी सुसज्ज असेलया मोटरसायकल्सवर तीन वर्षांची वॉरंटी तसेच तीन वर्षांचा रोडसाइड असिस्टन्स या सुविधा दिल्या जाणार आहेतम्हणजेच या सुविधांचा कालावधी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे.

 रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीविनोद दासारी नवीन बीएस VIची पूर्तता करणाऱ्या मोटरसायकलच्या लाँचबद्दल म्हणाले, ”काळापुढील विचार करणे आणि दीर्घकालीन धोरणांचा अवलंब करणे यांतूनच शाश्वत वाढ साध्य होते यावर रॉयल एनफिल्डचा विश्वास आहेबीएस VI उत्सर्जन नियमाचे पालन करण्यासाठी सरकारने दिलेले निर्देश हे स्वागतार्ह पाऊल आहेवाहतुकीच्या भविष्यकाळाच्या दिशेने टाकलेल्या पहिल्या पावलांपैकी हे एक आहेयामुळे केवळ पर्यावरणपूरक तंत्रज्ञान व शाश्वत वाहतुकीचीच हमी मिळणार नाहीतर भारतीय वाहन उद्योग जगातील अन्य वाहन उद्योगांच्या तुलनेत सरस ठरणार आहेनवीन श्रेणीमध्ये बीएस VIची पूर्तता दिलेल्या वेळेच्या पूर्वीच होईल याची काळजी आम्ही घेतली आहेजेणेकरून आमच्या सध्याच्या व संभाव्य ग्राहकांना उत्पादनाचा अखंडित अनुभव घेता येईलयामुळे ग्राहकांचा ब्रॅण्डवरील विश्वास वाढेल आणि शुद्ध मोटरसायकलिंगच्या विश्वात अधिकाधिक लोक प्रवेश करतील असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”