अभिनेते देव गिल यांच्या हस्ते अनिता गोरक्ष कुंजीर सन्मानित

338

प्रतिक गंगणे | मोबा. 7276314142

पुणे प्रहार । बटरफ्लाय या हिंदी चित्रपटाच्या शुभारंभानिमित्त बॉलीवुड प्रसिध्द अभिनेता देव गिल यांच्या हस्ते मराठी चित्रपट शेतकरी पँटर्नच्या डायरेक्टर सौ. अनिता गोरक्ष कुंजीर यांचा भव्यदिव्य सन्मान सोहळा पुणे येथे पार पडला.

पुण्यातील एस.पी. मैदानावर हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. निमित्त होतं ते हिंदी चित्रपट बटरफ्लाय या चित्रपट मुहुर्ताचं. या चित्रपटात बाल कलाकार तन्वी व प्रिन्स यांची गोड आणि निरागस अभिनय पहायला मिळणार आहे.
या शुभारंभावेळी प्रसिध्द अभिनेते देव गिल, अभिनेत्री झोया झवेरी, मराठी अभिनेते सुरेशजी विश्वकर्मा, अंकुशजी काकडे, स्वरंग बातमी समुहाचे निर्माते मनोहर जगताप, प्रमोद हंमबीर, (पो.नि.) सदानंद शेट्टी, सुजाता शेटी आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी शेतकरी पँटर्नची सर्व टीम उपस्थित होती. दरम्यान यावेळी अनिता व गोरक्ष कुंजीर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कल्पेश मेहता, तृप्ती कापरे, रेखा निंबाळकर, पवन सोनोने, सैफाली सय्यद, मिनाक्षी बनसोडे, रेश्मा खारवलीकर नम्रता नाईक, वेदातं ढमढेरे, भावना पलिवाल, भावीका पारडे, छाया लाड, हे उपस्थित होते. पद्मा ग्रुपचे सर्वेसर्वा श्री. शशिकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य सोहळा पार पडला.