नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी

140

६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेला 3-2 अशा गुणफरकाने पराभूत केले. याचबारोबर महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे. ही लढत पाहण्यासाठी खासदार आणि महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते.

६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने तर माती विभागातून शैलेश शेळके याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात हे मल्‍ल एकाच तालमीतील म्हणजे काका पवारांचे पठ्ठे मैदानात होते.

त्यातील नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली.