कविता सादरीकरणासाठी पालमपल्ले यांची निवड

27

जळकोट: आठ ते नऊ दिवसावर होऊ घातलेल्या आखील भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा या काव्यमंचावर जळकोट येथील नवोदित कवी बालाजी पालमपल्ले यांची निवड करण्यात आली आहे.

कवी बालाजी पालमपल्ले यांना कवी कट्टा या काव्यमंचावर “माझा निष्पाप धन्या” ही कविता सादर करण्यासाठी दि.११ जानेवारी २०२० रोजी कवितेचे सादरीकरण होणार आहे. बालाजी पालमपल्ले यांना साहित्य संमेलनाचे प्रमुख राजेश लाखे, कवी कट्टा समन्वयक युवराज नळे व स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांचे निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे.

या निवडीबद्दल जळकोट येथील ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन होत आहे .