बच्चू भाऊ मानले राव तुम्हाला! पदभार स्वीकारण्याआधी सामाजिक जबाबदारीचे भान

203

अचलपूरचे आमदार ओमप्रकाश कडू उर्फ बच्चू कडू हे रक्तदान करुन जलसंपदा राज्यमंत्रीपदाचा भार स्वीकारणार आहेत. शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेने त्यांना राज्यमंत्रीपद दिलं आहे.समाजसेवेचा पिंड असणारे आणि हटके आंदोलनांनी आमदारकी गाजवणारे राज्यमंत्री बच्चू कडू हे मंत्रिपद सुद्धा हटक्या प्रकारे स्वीकारणार आहेत.

मंत्रिपदाचा भार स्वीकारण्यापूर्वी ते मुंबईत मंत्रालया समोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली रक्तदान करुन मंत्रालयात कामकाज सुरु करणार आहेत.अशी माहिती एका वृत्त वाहिनीने दिली आहे.

बच्चू कडू हे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचे राज्यमंत्री आहेत.बच्चू कडू यांनी डिसेंबरला राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ५ डिसेंबरला मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं.आपल्या कामातून कर्तुत्व दाखवणाऱ्या अशा मंत्र्याला पाहून हेच म्हणावे वाटते,बच्चू भाऊ मानले राव तुम्हाला!