‘झी टॉकीज’वर झळकणार ‘कोती’

156

प्रेक्षकांची सर्वाधिक लाडकी आणि अत्यंत लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज, आज एक दशकाहून अधिक काळ सर्वांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांसाठी दर्जेदार सिनेमे, नाटकं, उत्तमोत्तम कार्यक्रम नेहमी प्रक्षेपित केले जातात. यातीलच एक अप्रतिम उपक्रम म्हणजे, ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’! वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कृष्ट चित्रपटांचे ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ रविवारी वाहिनीवर करण्यात येतात. येत्या रविवारी सुद्धा अशीच एक खास मेजवानी प्रेक्षकांसाठी ‘झी टॉकीज’वर असणार आहे. ‘कोती’ या सिनेमाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ वाहिनीवर होणार आहे.

लहानशा गावात राहणाऱ्या श्याम नावाच्या एका तरुणाची ही कथा आहे. श्यामची वागण्याची तऱ्हा काहीशी बायकी आहे. त्याच्या अशा वर्तनामुळे सगळेजण त्याचा तिरस्कार करतात. एवढेच काय, तर स्वतः श्यामचे वडील सुद्धा त्याचा खूप तिरस्कार करतात. त्याच्यामुळे समाजात आपला मान कमी होतो असा समज करून घेऊन, वडील त्याला मारहाण सुद्धा करतात. श्यामचा धाकटा भाऊ त्याच्यावर खूप प्रेम करतो. त्याच्याबाजूने उभा राहून, वडिलांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत सुद्धा तो बाळगतो. अशा सगळ्या परिस्थितीत, श्यामला घरापासून दूर पाठवण्याची वडिलांची इच्छा आहे.

आपल्या अस्तित्वाची लढाई श्यामला लढायची आहे. श्याम या लढाईत यशस्वी होणार का? तिरस्कार करणाऱ्या वडिलांना तो कशाप्रकारे तोंड देणार हे ‘कोती’ या सिनेमात पाहायला मिळेल.

‘कोती’ हा सिनेमा रविवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता ‘झी टॉकीज’वर पाहायला मिळेल. श्यामचं नक्की काय होतं ते जाणून घेण्यासाठी ‘कोती’ पाहायला विसरू नका.