मास्टरक्लासमुळे महत्त्वाकांक्षी चित्रपटनिर्मात्यांसाठी एका व्यासपीठाची निर्मिती

120
HyperFocal: 0

भारत हा अब्जावधी जनतेचा आणि अब्जावधी कथांचा देश आहे. या कथा खऱ्या, काल्पनिक, अचूक, चुकांनी भरलेल्या आणि अनेकदा खास आहेत. सिग्नेचर मास्टरक्लास आपल्या चौथ्या सीझनमध्ये देशाच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटनिर्मात्यांना या स्टोरीज आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना सांगण्यासाठी आणि आपल्या कथेचे दिग्दर्शन करून तिला लघुपटात रूपांतरित करण्यासाठी एक व्यासपीठ देत आहे.

सिग्नेचर मास्टरक्लास हे एक खास व्यासपीठ आहे, ज्याने मागील अनेक वर्षांमध्ये कलाकार, चित्रपटनिर्माते आणि त्यांच्या कथांच्या माध्यमातून चित्रपटविश्‍वाचा उत्सव साजरा केला आहे. आपल्या चौथ्या पर्वात या व्यासपीठाने आयुष्मान खुराना, राजकुमार राव आणि तमन्ना भाटिया यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमादरम्यान हे कलाकार कुब्रा सैत यांच्या निवेदनाद्वारे आयोजित कार्यक्रमात आपण उद्योगावर कशा प्रकारे ठसा उमटवला याच्या प्रामाणिक आणि वैयक्तिक कथा सांगतील. त्यानंतर या चित्रपटनिर्मात्यांना आपल्या कथा कलाकारांसमोर सादर करता येतील.

सिग्नेचर मास्टर क्लास उपक्रमांचे आयोजन पुणे, कोलकाता, गुवाहाटी व हैदराबाद येथे जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० दरम्यान केले जाणार आहे आणि चित्रपटनिर्माते आपल्या कथा या मोहिमेचा भाग होण्यासाठी www.signaturemasterclass.co.in येथे पाठवू शकतात. सिग्नेचर मास्टरक्लासच्या या पर्वाची निर्मिती व्हाइस मीडियाकडून कोम्युन आणि इंडिया फिल्म प्रोजेक्टच्या भागीदारीत केली जात आहे.