पत्नीनेच दिला पतीला ‘तिहेरी तलाक’

141
हरियाणा: देशामध्ये तिहेरी तलाक या महिलांच्या विरोधातील अनिष्ठ प्रथेविरोधात वादंग सुरु असतानाच हरियाणामधील उन्हेडी गावची रहिवाशी असलेल्या एका महिलेने ‘तिहेरी तलाक’चा उपयोग करून नवऱ्याला घटस्फोट दिल्याचे वृत्त उघडकीस आले आहे.
तीन मुलांची आई असलेल्या शाझिया नामक महिलेने एका कागदाच्या चिठ्ठीवर ‘तलाक-तलाक-तलाक’ असे लिहीत नवऱ्याला घटस्फोट दिला आहे. शाझियाने लिहिलेल्या पत्रामध्ये “जेव्हा पासून आपले लग्न झाले आहे तेव्हापासून तू माझा अनन्य छळ केला आहेस, दारू पिऊन मला मारहाण देखील केली आहे. तुझ्या त्रासाला मी कंटाळली असल्याने मी घटस्फोट घेत आहे” असे म्हंटले आहे. दरम्यान गेल्या वर्षीच सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी घटस्फोटाला बेकायदेशीर ठरवले होते.