टाटा मुंबई मॅरेथॉनकडून रन अ‍ॅज वनचे अनावरण

203

टीएमएमची प्रथम अधिकृत व्हर्च्युअल मॅरेथॉनमुळे सर्व धावपटूंना इव्हेंटचा भाग होण्याची संधी

मुंबई,  : टाटा मुंबई मॅरेथॉन २०२० मध्ये पदार्पण करणाऱ्या धावपटूसाठी भारतातील लांब पल्ल्याच्या रनिंग स्पर्धेचे प्रणेते असलेल्या प्रोकॅम इंटरनॅशनल यांनी असिक्स  रनकीपर या आघाडीच्या मोबाईल रनिंग एप प्रायोजित रन अ‍ॅज वनची घोषणा केली आहे.या व्हर्च्युअल रनच्या माध्यमातून धावपटूंना आशियाच्या आघाडीच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन 19 जानेवारी 2020 ला 42 किमी, 21 किमी व 10 किमी अशा वेगवेगळ्या गटात होणार आहे.

धावणे ही देशातील सर्वात वेगाने वाढणारा खेळ आहे. दरवर्षी सुमारे अडीच लाख लोक धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतात. या ट्रेंडची सुरुवात 2004 मध्ये मुंबई मॅरेथॉनच्या आगमनाने झाली आणि आज ही स्पर्धा आशियातील आघाडीची मॅरेथॉन असून जगातील पहिल्या दहा मॅरेथॉनपैकी एक आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन ही देशभरातील हौशी धावपटूंसाठी एक महत्त्वाची स्पर्धा आहे तथापि, दरवर्षी वाढलेली मागणी आणि वेळेची मर्यादा कमी झाल्यामुळे हजारो अर्ज नाकारले जातात. या व्यतिरिक्त, मुंबईतील सध्याच्या पायाभूत सुविधा व सुविधांवरील मर्यादांमुळे सहभागाची वाढही मर्यादित आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉनचा भाग होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो धावपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट रन अ‍ॅज वन च्या माध्यमातून समोर ठेवण्यात आले आहे. खर्‍या अर्थाने व्हर्च्युअल रन भौगोलिक सीमा ओलांडून टाटा मुंबई मॅरेथॉनचा जादू अनुभवण्यासाठी अनेक जणांना प्रोत्साहित करेल. आम्ही आपल्याला या अनोख्या उपक्रमात कुटुंब आणि मित्रांसह ऑनलाइन नोंदणी करण्यास आणि एकत्र सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो. स्टार्ट लाइनवर प्रत्यक्षरित्या हजर न राहता  आपण जिथे आहात तेथून टीएमएम 2020 चा अनुभव घेऊ शकता.

सहभागी होण्यासाठीtatamumbaimarathon.procam.in/run-as-one वर लॉगऑन करा आणि तीनपैकी कोणत्याही प्रवर्गासाठी 99 रुपये या नाममात्र फीसह नोंदणी करा. नोंदणी असिक्स रनकीपर अॅप डाउनलोड करा आणि निवडलेल्या अंतरासह टीएमएम रनमध्ये सहभागी व्हाअसिक्स रनकीपर अ‍ॅप एक अग्रगण्य मोबाईल रनिंग अ‍ॅप आहे जे वापरकर्त्यांना सहजपणे वर्कआउट्सचा मागोवा घेण्यास, लक्ष्य निर्धारित करण्यास आणि वेळोवेळी प्रगतीचे मोजमाप करण्यास मदत करते. 2008 मध्ये झालेल्या रनकीपरने जगभरात तब्बल 33 दशलक्ष फॉलोअर्ससह सर्वात यशस्वी ट्रॅकिंग अॅप्स ठरला आहे. हा अॅप 180 देशांमध्ये आणि 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. मार्च 2016 मध्ये असिक्स रनकीपरसोबत आला. स्मार्टफोनचा जीपीएस वापरुन धावण्याचे मार्ग, वेळ आणि अंतर शोधण्यासाठी अॅपची मदत होते. हे अॅप आयओएस आणि अँड्रॉइड डिव्हाइससह सुसंगत आहे.

धावपटूंना प्रोत्साहन म्हणून तीन श्रेणीतील (वय गटांतील) 500 पुरुष आणि महिला धावपटूंना टीएमएम 2021 मध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. नोंदणीकृत धावपटू हे ई-प्रमाणपत्र, ई-पदकास पात्र असतील. एक मुद्रणयोग्य बिब ज्यामध्ये खास तयार केलेला रन अ‍ॅज वन लोगो असेल. व्हर्च्युअल रनमध्ये सहभागासाठी अमर्याद स्पॉट्स आहेत, यामुळे अनेक उत्साही लोकांना ही चांगली संधी आहे.

प्रोकम इंटरनॅशनलचे सह व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग म्हणाले,की व्हर्च्युअल रन ही खेळाची भावना आणि तंत्रज्ञानाची शक्ती यांचा एक शानदार संगम आहे. या व्हर्च्युअल रन मुळे आम्ही भौगोलिक सीमा आणि कोर्स मर्यादा विचारात न घेता टाटा मुंबई मॅरेथॉन देशभरातील हजारो लोकांसाठी खुली केली आहे.  अधिकृत व्हर्च्युअल मॅरेथॉनचे अनावरण करत मुंबई मॅरेथॉनच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवल्याने आम्ही आनंदी आहोत.आम्ही आमच्या सर्व धावपटूंकडून चांगल्या शर्यतीची अपेक्षा बाळगली आहे व आम्हाला खात्री आहे की हे तुम्हाला # बी बेटरच्या माध्यमातून प्रेरणा देतील.