लाल इश्‍कच्‍या सेटवर इशानी शर्मा बनली प्रँकस्‍टर

34

&TV वरील मालिका लाल इश्‍कच्‍या सेटवर हास्‍याचे वातावरण निर्माण करत कलाकार व टीम मजेशीर जुन्‍या आठवणींमध्‍ये रमले आणि संपूर्ण टीमच्‍या मूडमध्‍ये उत्‍साह निर्माण झाला. मालिकेच्‍या आगामी एपिसोडमध्‍ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणारी टेलिव्हिजन अभिनेत्री इशानी शर्माने शूटिंगदरम्‍यान खूप धमाल केली. ती मालिकेच्‍या सेटवर सर्वांच्‍या खोड्या काढत होती.

तिच्‍या खोड्या काढण्‍याला पुढे घेऊन जात तिने जवळच्‍या गावातून सेटला भेट दिलेल्‍या काही लहान मुलांची खोडी काढण्‍याचे ठरवले. तिने मुलांना सांगितले की, सेटवर भूताची भूमिका साकारणा-या कलाकाराला ख-या भूताने झपाटले आहे. तिच्‍या या अनुभवाबाबत सांगताना ती हसत म्‍हणाली, ठिकाणाची भयानकता आणि शूटच्‍या ठिकाणी पसरलेले भयंकर वातावरण पाहून सेटवर आलेली मुले खूपच घाबरून गेली. मी त्‍यांच्‍या भयामध्‍ये आणखी थोडीशी भर केली. मी त्‍यांना सांगितले की, जे काही घडत आहे ते सर्व खरे आहे. त्‍यांच्‍या चेह-यावरील हावभाव बघण्‍यासारखे होते. त्‍यांच्‍यापैकी काहीजणांनी विश्‍वास देखील ठेवला. मी त्‍यांची मजा बघितल्‍यानंतर खरं काय ते सांगितले आणि आम्‍ही सर्वजण जोरजोरात हसू लागतो.

 याबाबत मजेशीर बाब म्‍हणजे आम्‍ही शूटिंग करत असताना आमच्‍या आसपास असलेल्‍या भटक्‍या कुत्र्यांना देखील खरोखरंच भूत असल्‍यासारखे वाटले. माझ्या मते या मालिकेने भयानक वातावरण निर्माण केले आहे, ज्‍यामुळे सर्वजण नेहमीच मालिकेसाठी उत्‍सुक असतात. आगामी एपिसोडमध्‍ये सान्‍या ऊर्फ इशानी शर्माला वाटते की, एक न्‍यायाधीश तिच्‍या पतीच्‍या मृत्‍यूसाठी जबाबदार आहे. त्‍याचा सूड घेण्‍यासाठी ती तिच्‍या पतीच्‍या शूजचा वापर करत एक योजना आखते. ती हे चमकदार शूज न्‍यायाधीशाच्‍या घरी पाठवते. शूजची आकर्षकता पाहून त्‍याकडे आकर्षून गेलेला न्‍यायाधीश ते परिधान करतो आणि त्‍याचे दुर्दैव भूत त्‍याला गिळून टाकतो. या घटनेनंतर न्‍यायाधीशाच्‍या घरामध्‍ये मृत्‍यूचे सत्र सुरू होते. त्‍याची मुलगी मदतीसाठी जगोलाकडे जाते. तो तिला सांगतो की, फक्‍त एक पवित्र आत्‍मा तिला या स्थितीमधून बाहेर काढू शकते. न्‍यायाधीशाचे जीवन आणि त्‍याच्‍या कुटुंबाला परत आणण्‍यासाठी कोण बलिदान देईल हे पाहणे रोमांचक असणार आहे.