जेएलएलने पुण्यातील मोक्याची जमीन सिंगापूरमधील विकसक मॅपलट्रीला 170 कोटी रुपयांमध्ये विकण्यासाठी दिली सेवा

165

मुंबई | जेएलएल इंडियाया देशातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कन्सल्टन्सी व प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्मने रिअल इस्टेट क्षेत्रातील सध्याच्या आव्हानात्मक स्थितीवर मात करून, पुन्हा एकदा पुण्यातील सर्वात मोठ्या जमीन व्यवहारासाठी योगदान दिले असल्याचे कंपनीने आज दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. सिंगापूरमधील रिअल इस्टेट विकास, गुंतवणूक, भांडवल व मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असणाऱ्या मॅपलट्री या नव्या मालकाने ही जमीन अजंता एंटरप्रायजेसया व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (BSE: 533156 | NSE: VASCONEQ | ISIN: INE893I01013) या रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन कंपनीचा 50% हिस्सा असणाऱ्या एसपीव्हीकडून 170 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

अंदाजे 8 एकरची ही जमीन पुण्यातील खराडी या मायक्रो-मार्केटमध्ये वसली आहे. या संपादनामुळे, मॅपलट्रीने देशातील एका आकर्षक ऑफिस मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. 800 कोटी रुपये हा प्रकल्पाचा अंदाजित खर्च असून, या जमिनीवर एक दशलक्ष चौरस फूट व्यावसायिक क्षेत्र बांधण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

अजंता एन्टरप्रायजेसच्या जमिनीची विक्री करण्याच्या सेवेमध्ये संपूर्ण कन्सल्टिंग सेवा आणि दोन्ही पक्षांसाठी संपूर्ण व्यवहाराचे व्यवस्थापन यांचा समावेश आहे. जेएलएलच्या भांडवल बाजार टीमने जमिनीची विक्री सुरळित व कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी योगदान दिले आहे.

या घडामोडीविषयी बोलताना, संजय बजाज, व्यवस्थापकीय संचालक, पुणे व ओव्हरसाइट – वेस्ट इंडिया, लँड अँड इंडस्ट्रीअल, जेएलएल इंडिया, यांनी सांगितले, “या व्यवहारामधील आमचे योगदान हे या शहरातील रिअल इस्टेटला आकार देण्यासाठी आम्ही बजावत असलेल्या सक्रिय भूमिकेचे प्रतिक आहे. निरनिराळ्या संपत्ती वर्गांतील आमच्या ग्राहकांसाठी विविध सेवा देण्याच्या बाबतीत आम्ही बिझनेसमध्ये सर्वोत्तम असल्याचेही या व्यवहारातून सिद्ध होते.”

“विशेषतः हा व्यवहार पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे या परिसराला विकसित होणे व राष्ट्रीय स्तरावर कमर्शिअल विस्तार करणे शक्य होणार आहे.”

पुणे विमानतळापासून जवळ असलेले खराडी मायक्रो मार्केट हे मूलभूत उद्योग श्रेणींमधील अन्य महत्त्वाच्या ऑक्युपायर्सबरोबरच पूर्व पुण्यातील आयटी व आयटीईएस कंपन्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण ठरते आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, हे ठिकाणअनेक बीएफएसआय ऑक्युपायर्ससाठी केंद्र बनले आहे.या ऑक्युपायर्सनी स्पेस संपादित केली आहे आणि येथील त्यांचे अस्तित्व वाढले आहे. खराडीमध्ये राहण्याचे विविध दरांमधील अनेक पर्याय, जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा, हॉस्पिटॅलिटी, रिटेल पायाभूत सुविधा अशा पायाभूत सुविधा आजूबाजूलाउपलब्ध आहेत.

मायक्रो-मार्केटला जोडणाऱ्यानियोजित ग्रिडसारख्या रस्ते विकासाबरोबरच, आणखी काही पायाभूत सुविधा उपक्रम येथे राबवण्यात आले असून त्यामुळे या ठिकाणाची उपलब्धता व कनेक्टिविटी वाढणार आहे.

या मायक्रो-मार्केटमध्ये काही महत्त्वाचे प्रकल्प समाविष्ट आहेत – गेरा कॉमरझोन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ईऑन फ्रीझोन एसईझेड. या मायक्रो-मार्केटमध्ये पंचशील, के. रहेजा ग्रुप, प्रेस्टिज असे मोठे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विकसक प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हैदराबाद व बेंगळुरू याबरोबरच, पुणे हे आयटी/आयटीईएस कंपन्यांचे आवडते शहर बनले आहे. जेएलएलच्या मते, पुण्यामध्ये 2019 मध्ये 6 दशलक्ष चौरस फुटाहून अधिक लीजिंग झाले.