‘झी रिश्ते पुरस्कार 2019’साठी श्रध्दा आर्य बनली स्वत:ची ड्रेस डिझायनर!

100

तुम्हाला दररोज आपले सर्व आवडते कार्यक्रम वेळच्या वेळी आणि योग्य प्रकारे पाहाता यावेत, यासाठी वर्षभर अथक मेहनत घेणार्‍्या टीव्हीवरील सर्व तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, लेखक, क्रिएटिव्ह टीम या सर्वांच्या कार्याची दखल घेण्याची वेळ आता आली असून त्यासाठी आपली सर्वांची आवडती वाहिनी ‘झी टीव्ही’ने ‘झी रिश्ते पुरस्करां’ची स्थापना केली आहे. यंदा हे पुरस्कार एका वेगळ्या ठिकाणी सादर केले जाणार असून या ‘जश्न-ए-पूर’ गावी जाण्यास आणि आपल्या आवडत्या कलाकारांची भेट घेण्यासाठी ‘झी टीव्ही’ने सुटीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्याचा संपूर्ण प्रसारण पाहण्यापूर्वी त्याची काही झलक पाहण्यासाठी ‘झी टीव्ही’च्या सोशल मीडियावर ‘#तिकिटटूजश्नेपूर’ या हॅश टॅगशी संबंधित राहा.

या महत्त्वपूर्ण सोहळ्यास टीव्ही उद्योगातील जवलपास सर्व दिग्गज तारे-तारका उपस्थित होत्या. पण या सोहळ्यासाठी श्रध्दा आर्यने स्वत:च ड्रेस डिझायनरची भूमिका स्वीकारली होती. जिथे जाते, तेथे ही अभिनेत्री सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेत असते. या कार्यक्रमात लाल गालिच्यावर येताना तिने अनुराधा खुराणाच्या मदतीने डिझाईन केलेला आपला काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता.

आपल्या या खास ड्रेसबद्दल श्रध्दा म्हणाली, “झी रिश्ते पुरस्कार 2019साठी मी काळ्या मखमली कापडापासून तयार केलेला काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. मी काळ्या रंगाची निवड केली कारण आमच्या कुंडली भाग्यच्या टीमने या रंगाचेच कपडे परिधान करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच काळा हा माझा सर्वात आवडता रंग आहे. या गाऊनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला खिसे आहेत. रेड कार्पेटवरील गाऊनला खिसे असावेत, यापेक्षा कोणत्याही मुलीची ककोणती वेगळी अपेक्षा असू शकते? अनुराधाच्या मदतीने या गाऊनचे डिझाईन करताना मला यात सेक्सी दिसायचं होतं, पण तरीही मला तो आरामदायक वाटायला हवा होता. सुदैवाने या गाऊनने मॅट आणि मखमली पोत अचूक दर्शविला आणि त्यामुळे या गाऊनची शालीनता वाढली.”