कामातून काहीसा विरंगुळा घेणे गरजेचे असते — मालिका भाबीजी घर पर है मालिका मधील अभिनेता रोहिताश्‍व गौड म्‍हणतो

81

आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही कामाची सामान्‍य वेळ आहेपण कलाकार घड्याळ्याच्‍या काट्याप्रमाणे अविरत शूटिंग करत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍याची खात्री घेतातत्‍यांच्‍यासाठी अभिनय ही पॅशन असली तरी कॅमेरामागे असलेल्‍या दबावांबाबत प्रेक्षकांना माहित नसते&TV वरील मालिका भाबीजी घर पर हैमध्‍ये तिवारीजीच्‍या भूमिकेसाठी लोकप्रिय असलेला टेलिव्हिजन अभिनेता रोहिताश्‍व गौडला वाटते कीकामात मन लागण्‍यासाठी कामातून काहीसा विरंगुळा घेणे आवश्‍यक आहे

 जवळपास २८ वर्षांपासून इंडस्‍ट्रीचा भाग असलेला अभिनेता अनेकदा अशा टप्‍प्‍यांवर येतोजेथे त्‍याला व्‍यस्‍त कामामधून मानसिकदृष्‍ट्या काहीसा विरंगुळा घेण्‍याची गरज भासतेरोहिताश्‍व म्‍हणतात, ”टेलिव्हिजनवरील कामाचे तास अत्‍यंत त्रासदायक  थकवणारे असू शकतातआम्‍ही एकत्र तासनतास काम करतो आणि आम्‍हाला आमच्‍या आरोग्‍याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाहीज्‍यामुळे शारीरिकदृष्‍ट्या  मानसिकदृष्‍ट्या ताजेतवाने राहण्‍यासाठी खटपट करावी लागते. 

 अशा मानसिक दबावाखाली असण्‍याच्‍या एका घटनेला उजाळा देत अभिनेता रोहिताश्‍व म्‍हणाले, ”मला आठवते कीएकदा मी सलग ५० तास शूटिंग करत होतोघरी परतत असताना माझे माझ्या कारवरचे नियंत्रण जवळपास सुटले होतेतो माझ्यासाठी भयानक अनुभव होताया घटनेने माझ्या मनावर खोलवर परिणाम केला आणि मला यातून सावरण्‍यास देखील काही अवधी लागला.” अभिनेता पुढे म्‍हणाला, ”हे कलाकारांच्‍या बाबतीत सामान्‍य आहेआम्‍ही व्‍यस्‍त वेळापत्रकझोपेचा अभाव यांमुळे सेटवर अनेकदा बेशुद्ध होतो आणि काही गंभीर स्थितीमध्‍ये हॉस्पिटलमध्‍ये देखील घेऊन जावे लागतेप्रसारणाच्‍या डेडलाइन्‍स असल्‍यामुळे दिग्‍दर्शकांना कलाकारांचे शॉट्स घेण्‍यासाठी हॉस्पिटलला यावे लागतेतेथे देखील आम्‍हाला आमची कामगिरी उत्तम वठवावी लागतेम्‍हणूनच कामातून काहीसा विरंगुळा घेणे आणि समतोल जीवन जगणे महत्त्‍वाचे आहेकाम हा जीवनाचा एक भाग आहेसर्वस्‍व नाही.”