सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे नवीन फंडे

176

गेल्या काही दिवसांपासून शहरात सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार, आमिषाला बळी पडून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका दिवसांत फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. ओएलएक्स, ट्रू कॉलर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून फसवणूक वाढली आहे.
इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या एका व्यक्तीला कॅनडावरून पार्सल पाठविलेली वस्तू घेण्यासाठी स्टॅम्प ड्यूटी भरण्यास सांगून तीन लाख २३ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्षीय व्यक्तीने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील राजयोग सोसायटीमध्ये राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेला पंचवीस लाखांचे लोन मंजूर करून देतो, असे सांगून वेळोवेळी एक लाख ३७ हजार ५०० रुपये बँक खात्यावर पाठवायला सांगून लोन मंजूर न करता आर्थिक फसवणूक केल्याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करूनही सायबर गुन्ह्यांत वाढ होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे