#बलात्कार : रिक्षा चालकाचा 18 वर्षीय मुलीवर बलात्कार

180

हैद्राबाद | तेलंगनाची राजधानी हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील बलात्काराची घटना ताजी आहेत. दरम्यान पुन्हा एकदा बलात्काराची घटना समोर आली आहे. एका रिक्षा चालकाकडून 18 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. 8 डिसेंबर रोजीच ही घटना घडली होती. त्याआधी दोन दिवस हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. त्यानंतर झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत आजीच्या घरी जात होती. यावेळी हा प्रकार घ़डला होता. तरुणी रस्ता विसरली असल्याचे आरोपीच्या भावाच्या लक्षात आले. यावेळी रिक्षाचालक असलेल्या आरोपीच्या भावाने त्या दोन्ही मुलींना घेऊन स्वत:च्या घरी नेले. यावेळी त्याच्या आईने मुलींना घरी सोडण्यासाठी लहान भावाला पाठवले. मात्र त्याने मुलींना घरी घेऊन न जाता परिसरातील लॉजवल नेले. दरम्यान लहान मुलगी झोपलेली असतानाच मोठ्या बहिणीवर नराधमाने अत्याचार केले. या सर्व घटनेनंतर तो रेल्वे स्थानकावर दोघींना सोडून तो फरार झाला. नंतर पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना फोन करुन सर्व माहिती दिली. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार अरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.