उरीनंतर आता ‘बालाकोट एअरस्ट्राइक’ची घोषणा, संजय लीला भन्साळी करणार प्रोड्यूस

178

मुंबई | संजय लीला भन्साळी , भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर एक चित्रपट घेऊन येत आहे. सर्व मिळून बालाकोट एअरस्ट्राइकवर चित्रपट बनवणार आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ठरले असले तरी चित्रपटात कोण कलाकार दिसणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलं नाही.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट परिसरातील तळ उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्याचा थरार या चित्रपटाच्या माध्यमातून आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. याविषयी बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले की, ‘बालाकोट एअर स्ट्राइक ही घटना आपल्या देशातील शौर्य, देशभक्ती आणि देशप्रेमाच प्रतीक आहे. हा चित्रपट भारतीय सैन्यातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा माझा प्रयत्न आहे.’