राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ येतोय  १ फेब्रुवारी रोजी

‘‘तुला माहीत आहे ना बाहेरच जग कसं आहे?’’ या प्रश्नावर ‘’बाहेरच्या जगाला सामोरे जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला दुबळंनको बनवू.’’ असा संवाद कोणत्याही पालकांमध्ये आज होत नाही. उलट आपल्या मुलांनी चार भिंतीत राहावे असे पालकांना वाटते. मात्र निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ या मराठी चित्रपटातील हा संवाद काही तरी वेगळे सांगू पाहत आहे, हे चित्रपटाच्यानुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर मध्ये बघायला मिळते. या ट्रेलरमुळे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या, बहुप्रतिक्षित ‘धप्पा’ बद्दलचीउत्कंठा अधिक ताणली गेली आहे. विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात  राष्ट्रीयएकात्मतेवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नर्गिस दत्त’ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. ‘धप्पा’ या चित्रपटाच्याट्रेलरमध्ये लहान मुले गणेशोत्सवासाठी ‘झाडे पळाली’ हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण विषयीचासंदेश देणार आहेत. या नाटकाच्या लेखिकेने वेग वेगळ्या पात्रांच्या मदतीने हा संदेश दिला आहे ज्यामध्ये येशू ख्रिस्त या पात्राचापण समावेश आहे. मात्र काही लोकांना ती बाब खटकते आणि परिणामी या लहान मुलांच्या नाटकाला विरोध होतो. त्यांचे पालकसुद्धा त्यांच्या बाजूने उभे राहत नाहीत. ज्या वयाच्या मुलांना ‘राजकारण म्हणजे काय?’ असा प्रश्न पडतो ती मुले या नाटकाचाप्रयोग करण्यासाठी ‘मिशन झॅप झॅप’ आखतात त्याचा रंजक प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे. या चित्रपटात अनेक लहान मुलांसह इरावती हर्षे, सुनिल बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप यांची चित्रपटातप्रमुख भूमिका आहेत. Post Views: 42

Read more

चाकण येथे आकर्षक स्टंट शो चे आयोजन

चाकण : केटीएम या युरोपातील दिग्गज अशा रेसिंग ब्रॅन्ड तर्फे चाकण येथे आकर्षक केटीएम स्टंट शो चे आयोजन केले होते.

Read more

उत्तम वाचकच लेखकाला घडवतो : बबन पोतदार 

पुणे (प्रतिनिधी) : लेखकाने लिहिलेले साहित्य हे वाचकाने वाचले पाहिजे. वाचकाने जर साहित्य वाचले तरच उत्तम लेखक घडतील. पुस्तके ही

Read more

…तर मी याहूनही अधिक उत्तम काम केले असते : विक्रम गोखले

पुणे : आजवर मी प्रकाशात रहावं म्हणून माझ्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांचा आज सन्मान होत आहे, याचा मला आनंद

Read more
error: Content is protected !!