चार जवानांनी चार वर्ष केला मुकबधीर नर्सवर बलात्कार

पुणे: एका मुकबधीर नर्सवर सैनिकी रुग्णालयात चार वर्षं बलात्कार केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी चार जवानांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला चतुर्थ कर्मचारी असून तिला १२ वर्षांचा मुलगाही आहे.

२०१४मध्ये ही महिला खडकी सैनिकी रुग्णालयात नर्स म्हणून रुजू झाली. एके दिवाशी नाइट शिफ्ट दरम्यान तिच्यावर एका जवानाने बलात्कार केला. या बलात्काराची माहिती तिने तिच्या वरिष्ठाला टेक्स्ट मॅसेजने दिली. तिच्या वरिष्ठाने संबंधित जवानाची तक्रार तर केली नाही उलट टेक्स्ट मॅसेज या महिलेला दाखवून तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांत अजून दोन जवानांनी या दोघांशी हातमिळवणी केली आणि या चार जणांनी तिच्यावर आलटून पालटून बलात्कार केले. तिने हॉस्पिटल व्यवस्थापनाला नाइट ऐवजी डे शिफ्ट देण्याची विनंती केली. पण त्यांनी तिच्या या मागणीकडे कानाडोळा केला.

जुलै २०१८मध्ये तिने इंदोरच्या एका सेवाभावी संस्थेला आपली कहाणी सांगितली. त्यांच्या प्रयत्नांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समितीही हॉस्पिटलने नियुक्त केली आहे. दरम्यान चारपैकी तीन जवानांची पुण्याबाहेर बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!